गरोदरपणातही रिलचा मोह आवरला नाही! मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल, प्रत्यूत्तर देत म्हणाली...

Sai Lokur Pregnancy: सोशल मीडियावर अनेकदा अभिनेत्री या ट्रोल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या सई लोकूर ही अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. नक्की यामागे काय कारण आहे हे पाहुया. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 6, 2023, 08:46 PM IST
गरोदरपणातही रिलचा मोह आवरला नाही! मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल, प्रत्यूत्तर देत म्हणाली... title=
sai lokur gets trolled for making reel in pregnancy video viral

Sai Lokur Pregnancy: सोशल मीडियावरून अनेकदा अभिनेत्रीही ट्रोलिंगचे शिकार होतात. सध्या अशीच एक अभिनेत्री ही सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. खरंतर नेटकऱ्यांना हल्ली कुठलाही विषय हा ट्रोलिंगसाठी पुरतो. त्यामुळे असावेळी या ट्रोलर्समुळे कलाकारांची जोरात चर्चा रंगलेली दिसते. सध्या या अभिनेत्रीचीही त्यामुळे जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे सई लोकूर हिची. सई लोकूरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

त्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा आहे. यावेळी मात्र तिला तिच्या एका व्हिडीओवरून ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी तिची त्यामुळेच जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या तिनं तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून हा फोटो शेअर केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी तिनं प्रेग्नंन्सीपुर्वी एकी रील शेअर केलं होतं. तेव्हाही तिला ट्रोल करण्यात आले होते. 

हेही वाचा : प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

तिनं त्यावेळी कव्वाला या गाण्यावर डान्स केला होता. हे रील सर्वत्र व्हायरल झाले होते. परंतु तिला मात्र यामुळे फारच टीका सहन करावी लागली होती. तिला तिच्या वजनावरून ट्रोल करण्यात आले होते. तिनं वनपीस घालून हा डान्स केला होता. त्यामुळे तिचे गुडघे हे फारच जाड दिसत आहेत. ती खूप जाड झाली आहे. म्हणत तिला बॉडी शेमिंगवरून ट्रोल केले होते. त्यानंतर आता तिनं प्रेग्नंट असतानाच एक डान्स रिल व्हिडीओ हा शेअर केला आहे. यावेळी तिला परत ट्रोल करण्यात आलं आहे. परंतु यावेळी तिनं या ट्रोलर्सची चांगलीच शाळा घेतली आहे. यावेळी तिला कमेंट्सवर योग्य ते उत्तर देऊन त्यांना गप्प केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सई लोकूर ही आपल्या 9 व्या महिन्यातील प्रेग्नंन्सीमध्ये आहे. तेव्हा तिला कसं फील होतंय यावर तिनं हे रील शेअर केलं आहे. सध्या हे रील तिच्या चाहत्यांमध्ये चांगलं व्हायरल झालं आहे. 'अगं तुला हे शोभत नाही…यापेक्षा आराम कर, अतिउत्साही होऊ नकोस' अशी एका युझरनं कमेंट केली आहे. परंतु यावर सईनं प्रत्युत्तर दिलं आहे. 'मला जे योग्य वाटतं ते मी नेहमीच करते. तुम्हाला आवडत नसेल तर बघू नका. माझ्या येणाऱ्या बाळाला मी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही? याचा मला काहीच फरक पडत नाही' अशी तिनं प्रतिक्रिया दिली आहे.