सई ताम्हणकरने नव्या वर्षाचे स्वागत केले 'या' खास अंदाजात

नवं वर्ष सुरू झालं की त्यासोबत नव्या वर्षाचा संकल्प येतो.

Updated: Jan 2, 2018, 09:32 AM IST
सई ताम्हणकरने नव्या वर्षाचे स्वागत केले 'या'  खास अंदाजात title=

मुंबई : नवं वर्ष सुरू झालं की त्यासोबत नव्या वर्षाचा संकल्प येतो.

अनेकदा हा संकल्प मध्येच संपतो. 'व्यायाम,'आरोग्य' या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वर्षाच्या सुरूवातीला अनेकजण जिममध्ये जाण्याचा संकल्प करतात पण जानेवारीच्या महिन्याअखेरीसच त्याचा बोजवारा उडाल्याचे स्प्ष्ट लक्षात येते.  

अभिनेत्री सई ताम्हणकरने मात्र नव्या वर्षाची सुरूवातच नव्या लूकमध्ये केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसह अनेकांना फीटनेसचं मेजर गोल मिळाले आहे.  

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक खास अंदाजातील फोटो शेअर केला होता. रिप्ड बॉडी, फ्लॅट बेलीतील सई ताम्हणकरचा अंदाज कालपासूनच सोशल मीडियामध्ये झपाट्याने शेअर होत आहे. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरूरकरने सईचा नवा लूक क्लिक केला आहे.  

 

 

सई ताम्हणकरचा लूक  

 सईने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी सईच्या मेहनतीचे कौतुक केले आहे तर काहींना तिचा हा लूक फारसा पटला नाही.  
 
 नव्या वर्षाच्या स्वागताला मी नव्या स्वरूपात सज्ज  झाली आहे अशा आशयाचे कॅप्शन देत  सईने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  

 
 वजनदार सईचा नवा अंदाज 

 
 'लठ्ठ'पणा  या समस्येवर भाष्य करणारा 'वजनदार' चित्रपट मागील वर्षी रसिकांच्या भेटीला आला  होता. त्यावेळेस वजन वाढवून ते पुन्हा आटोक्यात आणण्यासाठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापटने जिममध्ये घाम गाळला होता. पण केवळ चित्रपटापुरता वजन कमी जास्त न करता स्वतःला फीट ठेवण्यासाठी या अभिनेत्रींचा अधिक ओढा असल्याचे अनेकदा त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले आहे.  
 
काही दिवसांपूर्वी अभिनेता उमेश कामतनेही सिक्स पॅक अ‍ॅब्समधील खास लूक शेअर केला होता.