Kareena Kapoor Baby Boy Name : सैफ-करिनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव ठरलं

पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आलं करिनाच्या दुसऱ्या लेकाचं नाव 

Updated: Jul 9, 2021, 12:35 PM IST
Kareena Kapoor Baby Boy Name : सैफ-करिनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव ठरलं

मुंबई : करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan)  यांना दुसरा गोंडस मुलगा झाला आहे. या मुलाच्या जन्मानंतरच त्याच्या नावाची चर्चा रंगली. सैफिनाचा मोठा मुलगा 'तैमूर' हे नाव अगदी सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. (Saif Ali Khan And Kareena Kapoor Khan Second Baby Name Revealed After Four-And-A-Half Months) आता सगळ्यांनाच तैमूरच्या भावाचं नाव काय असणार? याची चर्चा रंगली होती. अखेर हे नाव समोर आळं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

काय आहे दुसऱ्या बाळाचं नाव? 

बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, करिना आणि सैफ यांच्या लहान मुलाचं नाव समोर आलं आहे. या दोघांनी आपल्या दुसऱ्या बाळाचं नाव जेह (Jeh) असं ठेवलं आहे. दुसऱ्या बाळाच्या नावाचा अर्थ 'निळ्या रंगाचा पक्षी' (blue crested bird).

सैफ आणि करिनाने हे नाव खरंच ठेवलं आहे की, याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही. सैफला आपल्या वडिलांचं नाव लहान मुलांना द्यायचं होतं. त्यामुळे वडिल मंसूर अली खान पटौदी यांचं नाव लहान मुलाला 'मंसूर' असं ठेवायचं होतं. मात्र अद्याप हे नाव समोर आलेलं नाही. 

नाही दाखवला मुलाचा चेहरा 

काही दिवसांपूर्वी करिनाने एक फॅमिली फोटो शेअर केला. मात्र यामध्ये करिनाने आपल्या लहान मुलाचा फोटो दाखवलेला नाही. करिन आणि सैफ यांनी अगदी सुरूवातीपासूनच ठरवलं होतं की, दुसऱ्या बाळाला मीडियापासून लांब ठेवायचं. ते आपल्या बाळाला मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवणार. त्यांना तैमूरप्रमाणे दुसऱ्या बाळाला मीडियासमोर आणायचं नाही. 

तैमूरला मिळालेल्या लाइमलाइटमुळे करिना आणि सैफ खूप सतर्क आहेत. त्यांना आपल्या मुलाला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवायचं आहे.

About the Author