...हम अपनी मस्ती मे; सैफच्या लेकीनं सोडली मुंबई, आनंदात जगतेय आयुष्य

 'कश्मीर की कली इज बॅक टू यूअर गली...', सैफच्या लेकीचा वेगळाचं थाट  

Updated: May 14, 2022, 01:11 PM IST
...हम अपनी मस्ती मे; सैफच्या लेकीनं सोडली मुंबई, आनंदात जगतेय आयुष्य  title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मनसोक्त फिरत आहे. साराला फिरायला आणि वेग-वेगळ्या पदार्थांची चव घ्यायला फार आवडत. आता देखील सारा मुंबई सोडून काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. साराने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये सारा सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेल्या पहलगामच्या खोऱ्यात तुमच्या ट्रेकिंगचा आनंद घेताना दिसत आहे.

काश्मीरमधील फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'कश्मीर की कली इज बॅक टू यूअर गली...' असं लिहिलं आहे. सध्या साराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काश्मीरमध्ये साराने फक्त ट्रेकिंगचा आनंद घेतला नाही, तर तिने स्वयंपाक देखील बनवला आहे. स्वयंपाक करताना देखील तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

स्वयंपाक करताना व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. सारा अली खान सध्या काश्मीरमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेत आहे. याआधी त्याने त्याच्या इंस्टा वर काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये सारा हिमाच्छादित टेकड्यांवर पोज देताना दिसत आहे.