भररस्त्यात सैफचं अनोळखी व्यक्तीसोबत भांडण; अभिनेत्याने घेतला चावा

अभिनेत्याने भर रस्त्यात एका अनोळख्या व्यक्तीसोबत भांडायला सुरुवात केली आणि.... अभिनेत्याच्या मित्राचा मोठा खुलासा

Updated: Apr 14, 2024, 02:16 PM IST
भररस्त्यात सैफचं अनोळखी व्यक्तीसोबत भांडण; अभिनेत्याने घेतला चावा title=

मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान कायमच आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. कधी एअरपोर्ट लूक तर कधी सेलेबची हाईफाय पार्टीमध्ये अभिनेत्याचा नवाबी अंदाज पहायला मिळू शकतो. या व्यतिरीक्त अभिनेत्याचा कॉमेडी आणि एक्शन अवतारदेखील फॅन्सला खूप आवडतो. मात्र एकदा ड्राईव्हिंग करतना अभिनेत्याने भर रस्त्यात एका अनोळख्या व्यक्तीसोबत भांडायला सुरुवात केली होती. ज्याबद्दल स्वत: त्याच्या मित्राने सांगितलं आहे. 

या कारणामुळे सैफसोबत झालं भांडणं
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सैफचा मित्र कमल सदानाने सैफच्या एका फनी भांडणाबद्दल बोलताना सांगितलं आहे की, 1990 साल होतं जेव्हा मी, सैफ आणि अमृता कुठेतरी आऊटिंगवरून परतत होतो. त्यावेळी सैफ कार चालवत असताना जवळच असलेल्या एका कारने चुकीचे वळण घेतल्याने सैफला राग आला. या रागात सैफने गाडीच्या ड्रायव्हरला हाताने काही ईशारे केले.

यानंतर सैफ आणि समोरच्या कारमधील व्यक्ती बाहेर पडले. आणि दोघंही एकमेकांसोबत जोरदार भांडू लागले. मी आणि अमृता कारच्या बोनेटवर बसून सगळी फाईटींग बघत होतो. त्यानंतर सैफ त्या समोरच्या व्यक्तीला चावला आणि ती व्यक्तीदेखील सैफला जोरात चावली. हे बघून मी आणि अमृता थक्क झालो होतो.  

पुढे अभिनेता म्हणाला, यानंतर दोघंही अचानक उठले आणि जोर-जोरात हसू लागले. इतकंच नाही तर एकमेकांना मिठीही मारली या दोघांनी. सुरु असलेलं एक्सट्रीम लेवलचं भांडणं फनी अंदाजात संपलं. आणि सैफ यानंतर हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याने एक टेटनसचं इंजेक्शन घेतलं.''

सध्या अभिनेता त्याचा आगामी तेलुगु  सिनेमा 'देवारा'मुळे चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्यासोबत जूनियर एनटीआरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेता सिद्धार्थ आनंदच्या अपकमिंग सिनेमा 'ज्वेल थीफ'मध्ये झळकणार आहे. या सिनेमात जयदीप अहलावतदेखील दिसणार आहे. सैफ अली खानने 2012 मध्ये त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले. दोघांकडे तैमूर आणि जेह अशी दोन बेटे आहेत. सध्या सैफ अली खान पत्नी करीना आणि दोन मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे.