ठरलंय तर अडलंय कुठं? महायुतीचा मुख्यमंत्री ठरला मग नावाची घोषणा का नाही?

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरल्याचं महायुतीचे नेते सांगतातयत. मुख्यमंत्री ठरलाय तर महायुती जाहीर का करत नाही असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री निवडण्यात शिवसेनेचा कोणताही अडथळा नसल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय. मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा अप्रत्यक्षपणं कायम आहे.

नेहा चौधरी | Updated: Dec 2, 2024, 08:34 PM IST
ठरलंय तर अडलंय कुठं? महायुतीचा मुख्यमंत्री ठरला मग नावाची घोषणा का नाही?
Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे जवळपास ठरल्याचा दावा महायुतीकडून केला जातोय. पण महायुतीचं जर ठरलंय मग महायुतीचा मुख्यमंत्री जाहीर का होत नाही असा सवाल आता सामान्यांकडून विचारला जातोय. मुख्यमंत्री निवडीत आपला कोणताही अडथळा नाही असं सांगणाऱ्या शिवसेनेची आता थोडी भाषा बदललीय. भाजपनं खुशाल मुख्यमंत्री निवडावा असं मुख्यमंत्री सांगत नाहीयेत. मुख्यमंत्री अजून ठरायचा आहे. तीन नेते बसून मुख्यमंत्री ठरवू असं एकनाथ शिंदे सांगू लागलेत.

Add Zee News as a Preferred Source

शिवसेना नेतेही आडून आडून मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा आहे हे सांगायला विसरत नाही. पण शेवटी बोलताना मुख्यमंत्री दिल्लीतले नेते सांगतील ते असतील असंही सांगतात.

महायुतीतला तिसरा भागीदार असलेली राष्ट्रवादी मात्र अगदी स्पष्ट आहे. मुख्यमंत्री काहीही झालं तरी भाजपचाच होणार असं राष्ट्रवादी ठासून सांगतेय.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तर निकालाच्या पहिल्या दिवसापासून आठवले भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं सांगतायेत. त्याचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केलाय.

महायुतीत सगळं काही  अलबेल असेल पण मुख्यमंत्रिपदावरुन अलबेल आहे हे आता मात्र सांगता येणार नाही. ज्याअर्थी मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर होत नाही त्याअर्थी भाजपच्या दाव्याला मित्रपक्षांपैकी कुणाचा तरी विरोध असल्याची चर्चा सुरु झालीय. 

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More