Girish Mahajan Meet Eknath Shinde : महायुतीचा शपथविधी सोहळा येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी मुख्यमंत्र्यांचं नाव गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे खातेवाटपासंदर्भातही कुठलीही माहिती समोर आलेली नाही. अशात अचानक सोमवारी (2 डिसेंबरला) भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीष महाजन ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर चर्चांना एकच उधाण आलं.
महायुतीत काहीही आलबेल नाही अशी चर्चा रंगली असताना अचानक भाजपने संकटमचक शिंदेंच्या भेटीला जाणे, यामुळे महायुतीत खातेवाटपावरून काही मतभेद तर नाही, अशी शंका जोर धरु लागली. मात्र ठाण्यातल शुभदीप निवासस्थानी सव्वा तास चर्चा झाल्यानंतर महाजन पत्रकारांशी बोलले तेव्हा त्यांनी महायुतीत सर्व काही आलबेल असून कुठलेही मतभेद नाहीत, असं स्पष्ट केलं. गेल्या चार पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही. त्यांना मी यापूर्वीच भेटीची वेळ मागितली होती. पण ते दरे गावी गेल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो.
महाजन पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद देऊन सांगितलं होतं, आम्ही नाराज नसून महायुतीत सगळं ठिक आहे. मग मी वेगळं काही सांगायची गरज नाही. एकनाथ शिंदे यांचं मन याबाबत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. 5 तारखेची आमची तयारी सुरु आहे. मला असं वाटतं उद्या त्यांची तब्येत बरी होईल आणि त्यानंतर ते स्वत: बैठकी घेणार आहेत.
खातेवाटपाबद्दल आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. खातेवाटपाबद्दल महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल. कोण खातं कोणाला पाहिजे याबद्दल चर्चा झाली नसून मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी आलो होतो. काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने ते उद्या 6 डिसेंबरच्या तयारीसाठी बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत उद्या बरी होईल असं मी म्हटलंय. आम्ही सगळे एकत्र आहोत, उद्यापासून एकनाथ शिंदे लिड घेतली. महायुतीत कुठेही मतभेद नाही. आम्ही प्रामाणिकपणे महायुतीत एकत्र आहोत. 5 तारखेला आमचा शपथविधी होणार आहे, आम्ही हे सगळं एकत्रित करणार आहोत. 5 तारखेला शपथविधी हा अतिशय दिमाखदार होणार आहे, असंही महाजन यांनी सांगितलं.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.