लॉकडाऊनमध्ये Kareena ला Saif वर चाकू उगारण्याची का आली वेळ?

लॉकडाऊनमध्ये घरातील वादाचे प्रमाण वाढले 

Updated: Jul 27, 2021, 09:07 AM IST
लॉकडाऊनमध्ये Kareena ला Saif वर चाकू उगारण्याची का आली वेळ?

मुंबई : कोरोनाकाळात अचानक आलेला लॉकडाऊन हा प्रत्येकासाठीच नवीन होतात. कित्येक महिने काहीही न करता फक्त घरात बसणं हे प्रत्येकासाठीच कठीण होतं अशावेळी घराघरात वाद होणं ही काही नवी गोष्ट नाही. मग हा वाद सेलिब्रिटींनाही चुकला नाही. 

करीना आणि सैफच्या घरी लॉकडाऊनमध्ये चक्क चाकू उगारण्याची वेळ आली. तर झालं असं, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची वजन वाढली तर काहींची दाढी तर काहींचे केस. अशावेळी प्रत्येकाने आपल्या घरी हातात कच्ची घेतली होती. यामध्ये अभिनेता सैफ अली खान देखील काही मागे नव्हता. 

सैफ अली खानने यावेळी हातात कैची घेऊन तैमूरचे केस कापले. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर या फोटोवरून सैफला एका कार्यक्रमात, 'तू कतरिनाचे देखील केस कापलेस का?' असा सवाल करण्यात आला. यावर सैफने दिलेलं हे उत्तर चर्चेत आहे. 

सैफ अली खान  (Saif Ali Khan) 'Feet Up With The Stars season 3' मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याला लॉकडाऊनमध्ये कतरिनाला हेअरकट का दिला नाही? असा सवाल करण्यात आला. 

हा राष्ट्रीय गुन्हा

सैफ म्हणतो की,'हे भरपूर अनप्रोफेशनल गोष्ट झाली असती जर मी तिला हेअर कट दिला असतो. तो एक राष्ट्रीय गुन्हा ठरला असता. आम्ही अजूनही काम करतोय त्यामुळे आम्ही पंगा घेऊ शकत नाही. ती माझ्या केसांसोबत मस्करी करू शकते. मात्र मी नाही.'