मुंबई : सैफ आणि करिना कपूरपेक्षा त्यांचा चिमुकला नवाब तैमूरच सध्या बातम्यांचा भाग अधिक असतो.
तैमुरचा येणारा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो.
तैमूरचे निरागस डोळे पाहतच रहावे असे अनेकांना वाटते. परंतू लवकरच तैमूर आपल्यापासून दूर जाणार आहे. तैमुरचे निरागस बालपण टिकून राहण्यासाठी त्याला इंग्लंडमधील एका बोर्डींग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय सैफ आणि करिनाने घेतला आहे.
स्वतः सैफ अली खान सुमारे ९ वर्ष त्यानंतर सैफचा मोठा मुलगा इब्राहीमदेखील इंग्लंडमधील बोर्डींग स्कुलमध्ये राहिला. त्यानंतर हाच निर्णय तैमुरचा बाबतीतही घेतला जाणार असल्याचे सैफने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात तैमुर एका वर्षाचा होणार आहे. सतत प्रसारमाध्यमासमोर राहणं यामुळे तैमुरचे बालपण हरवण्याची भीती आहे. त्यावरील उपाय म्हणून सैफ आणि करिनाने घेतलेला हा निर्णय कधी प्रत्यक्षात येणार हे पहावं लागणार आहे.