'सैराट' फेम रिंकू राजगुरूचा 'हा' नवा सिनेमा

'सैराट'मधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 19, 2017, 11:35 AM IST
'सैराट' फेम रिंकू राजगुरूचा 'हा' नवा सिनेमा title=

मुंबई : 'सैराट'मधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू.

आता रिंकू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं नाव काय हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटाचं नाव 'कागर' ! रिंकू आणि मकरंदच्या या नव्या चित्रपटाचं नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला. या नावाच्या केलेल्या डिझाईनवरून चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करता येतात. 'कागर' ह्या नावाचा फाँट हा बघताक्षणी अॅग्रेसिव्ह वाटतो. सध्या जगात या विचारसरणीचा जास्त प्रभाव वाहतो आहे. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा प्रश्न आहे.

काय आहे सिनेमांत?

 गुलाल कायम विजयाचा रंग आहे. हा विजय नक्की कोणावर आहे. यामध्ये केलेली मात ही असुरावर आहे, की स्वतःमध्ये अडकलेल्या आपल्यावर आहे. याचा अंदाज आपण हे नाव बघून बांधू शकतो. 'कागर' या नावावर असलेले पांढरे डाग कदाचित उपरेपणाचे जाण करून देतात. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपले अस्तित्व या डागांसारखे तुरळक आहे अशी जाणीव या पांढऱ्या डागांमुळे होत राहते. 
 
 तसेच काही ठिकाणी रक्ताचा ओघळ दिसत आहे, जो एका फांदीतून बाहेर पडलेला दिसतोय. ज्यातून या चित्रपटात बरीच नाट्यमयता आहे, याची शक्यता नाकारता येणार नाही. या चित्रपटात रिंकूसह बाकी कलाकार कोण आहेत, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे. 'उदाहरणार्थ निर्मित'चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.  

चित्रपटाच्या नावाच्या डिझाईनविषयी दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, 'जेव्हा चित्रपटाचे नाव आपण जाहीर करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते. चित्रपटातून आपण नेमकं काय मांडू पाहतोय याची ती पहिली झलक असते. 'कागर'चा फाँट डिझाईन करणारे चैतन्य संत यांना कथा ऐकवल्यानंतर त्यांनी गोष्टीच्या महत्वाच्या घटकांचा विचार करून, खूप विचारपूर्वक आणि कथेचा सार याचं मिश्रण करून आकर्षण निर्माण करणारा 'कागर'चा फाँट तयार केला आहे. 

चैतन्य संत हे नेहमी कथेची मांडणी आणि त्यावरून दृश्य स्वरुपात नेमक काय दिसेल याचा अंदाज घेऊन डिझाईन करतात. रिंगण चित्रपटाच्या वेळी वडील मुलगा नाते आणि त्यातून कथेची साधेपणाची मांडणी याचा विचार करून प्रतीकात्मक पोस्टर तयार केले होते ज्यात परीस्थितीने आपण रिंगणात अडकतो याचे मांडणी करण्यासाठी त्यांनी रिंगण या नावाला एका गोलाकार भागात अडकवले होते. तसेच 'कागर'ला गोष्टीनुसार आकार देण्याचा प्रयत्न या नावाच्या डिझाईनवर केला आहे. हे बघून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी नक्कीच कुतूहल निर्माण होईल, याची मला खात्री आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना बरीच सरप्राईज मिळणार आहेत.'