बिग बॉस : डिझायनरने हिना खानवर लावला 'हा' आरोप...

टी.व्ही. अभिनेत्री हिना खान हीचे छोट्या पडद्यावर चांगलेच नाव आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 19, 2017, 10:24 AM IST
बिग बॉस : डिझायनरने हिना खानवर लावला 'हा' आरोप... title=

नवी दिल्ली : टी.व्ही. अभिनेत्री हिना खान हीचे छोट्या पडद्यावर चांगलेच नाव आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून तिचा छोट्या पडद्यावरील प्रवास सुरू झाला. या मालिकेत तिने ८ वर्ष काम केले. त्यानंतर ती 'खतरो के खिलाडी' या रियालिटी शो मध्ये सहभागी झाली. आता ती कलर्स वाहिनीवरील 'बिग बॉस ११' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शो मधील तिचा लूक्स, कपडे, डिझाईन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. 

 स्टाईल आयकॉन

काही दिवसांपूर्वी एक्स कंटेस्टेंट रोहन मेहरा यांनी 'बिग बॉस' च्या घरात पर्दापण केले तेव्हा त्यांनी तिला स्टाईल आयकॉनचा किताब दिला. यानंतर ट्विटरवर डिझायनर निरुशा निखतने व्हॉट्स अॅपवर स्टायलिशने पाठवलेल्या मेसेजचा स्किनशॉट शेअर केला. घरात मागवलेले कपडे घेऊन ती गेली आणि स्टायलिशने तिला मेसेज पाठवूनही तिने मात्र डिझाइन्स पाठवले नाहीत. 

ड्रेससोबत फोटो शेअर

हिना खानच्या इंस्टाग्रामवर रोज तिची स्टायलिश तिचा ड्रेससोबत फोटो शेअर करते. त्यात तिच्या आऊटफिटबद्दल सर्व माहिती असते. मग तो तिचा नाईटसुट का असेना.

अत्यंत इंटरेस्टिंग

बिग बॉसच्या घरात सध्या ८ सदस्य राहीले आहेत. घरातील वातावरण अत्यंत इंटरेस्टिंग झाले आहे. सोमवारी हिना खान सोडून घरातील सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहेत.