म्हणून भाईजानच्या अडचणीत आणखी वाढ

खोटे प्रतिज्ञा पत्र दाखल केल्याच्या आरोपाखली अभिनेता सलमान खानवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Mar 16, 2019, 12:21 PM IST
म्हणून भाईजानच्या अडचणीत आणखी वाढ title=

वीस वर्षांपूर्वी दोन काळवीटींची शिकार केल्याप्रकरणी भाईजान सतत न्यायालयाच्या फेऱ्या मारताना दिसत होता. पण आता दबंग अभिनेता सलमान खानच्या आडचणीत वाढ होताना दिसत आहे. खोटे प्रतिज्ञा पत्र दाखल केल्याच्या आरोपाखाली शनिवारी जोधपूरच्या सीजेएम ग्रामीण न्यायालयात सुनावणी होणर आहे. सलमानवर कायद्याच्या कलम 340  अंतर्गत न्यायालयाची दिशा भूल करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. 'हम साथ साथ हैं' सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेस न्यायालयात खोटे प्रतिज्ञा पत्र दाखल केले होते. त्याचप्रमाणे सलमानने हत्यारांचा परवाना हरवल्याचे खोटे प्रतिज्ञा पत्र न्यायालयात सादर केले होते. 

ऑगस्ट 2018 मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान जयपूर सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिला होता. ज्यामध्ये सलमानला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि न्यायालयाच्या परवानगी शिवाय परदेश प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली होती. देशात काळवीट एक लुप्तप्राय प्रजाती मानली जाते. त्यांना वन्यजीवन कायद्यांतर्गत सुरक्षित घोषित करण्यात आले आहे.

'हम साथ साथ हैं' सिनेमाच्या शूटिंगसाठी सिनेमाची संपूर्ण टिम राजस्थान मध्ये होती. 1-2 ऑक्टोबर 1998 सली मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी सलमान वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे  उपस्थित होते. सलमान खानला दोषी ठरवत. न्यायालयाने उर्वरित आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली होती.