सलमानच्या चाहत्यांसाठी एकाच दिवशी 'ईद-दिवाळी'ची खुशखबर

सलमानच्या चाहत्यांसाठी खुशखबर...

Updated: Jan 10, 2020, 05:33 PM IST
सलमानच्या चाहत्यांसाठी एकाच दिवशी 'ईद-दिवाळी'ची खुशखबर title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. सलमानने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान २०२१च्या ईदच्या मुहुर्तावर एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान त्याचे चित्रपट ईदच्या दिवशीच प्रदर्शित करतो. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, सलमानच्या या आगामी चित्रपटाचं नाव सणांशी जोडलेलं आहे.  सलमानने २०२१ मध्ये येणाऱ्या चित्रपटाचं नाव 'कभी ईद कभी दिवाली' असल्याचं ट्विट केलं आहे.

'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. तर साजिद नाडियाडवाला आणि सलमान खान प्रोडक्शन चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चित्रपटाच्या इतर स्टारकास्टबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, सलमानच्या 'दबंग ३'ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज' चित्रपटामुळे 'दबंग ३'च्या कमाईवर काहीसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. 

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सध्या सलमान प्रभुदेवा दिग्दर्शित बहुचर्चित 'राधे' (Radhe)चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमानसोबत, अभिनेत्री दिशा पटाणी प्रमुख भूमिकेत स्क्रिन शेअर करणार आहे. 

नुकतीच, सलमानने इंडस्ट्रीत ३० वर्ष पूर्ण केली आहेत. बॉलिवूडमध्ये उत्तम अभिनयासह, प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचं मनोरंजन करणाऱ्या सलमानने आपली वेगळीच एक खास ओळख निर्माण केली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये सलमानने ३०० कोटींहून अधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. आता सलमानचा 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट, ईद-दिवाळी या धमाकेदार सणांच्या नावाप्रमाणे डबल धमाका करणार का, हे पाहणं  मजेशीर ठरणार आहे.