जेव्हा सलमान खान आणि अर्जुन कपूर आले आमने-सामने, व्हिडीओ व्हायरल

अर्जुन कपूरचं सलमानच्या कुटुंबासोबत खास कनेक्शन  

Updated: Feb 5, 2022, 09:00 AM IST
जेव्हा सलमान खान आणि अर्जुन कपूर आले आमने-सामने, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या अफेअर्सच्या चर्चा सर्रास रंगत असतात. सध्या अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचं नातं चर्चेचा विषय आहे. जेव्हा अर्जुन आणि मलायका यांच्यात प्रेमाचा गुलाब बहरला, तेव्हापासून अभिनेता सलमान खान आणि अर्जुनचे संबंध बिघडले. एका व्हिडीओतून हे सत्य समोर आलं, त्यांच्यातील संबंध नक्की कसे आहेत. जेव्हा सलमान आणि अर्जुन आमने-सामने आले तेव्हाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

अभिनेत्री सोनम कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये सलमानला आमंत्रण दिलं. तेव्हा त्याठिकाणी अर्जुन देखील होता. आजही सलमान आणि अर्जुन एकमेकांना पसंत करत नसल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान रिसेप्शनमध्ये येताच तो अभिनेत्री कतरिना कैफला भेटतो. त्यानंतर बोनी कपूरला भेटण्यासाठी जातो. पण तेथे उभ्या असलेल्या अर्जुनच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नक्की काय आहे प्रकरण? 
मलायका अरोरा सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी होती. पण लग्नाच्या जवळपास 17 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मलायकाचं नाव अर्जुनसोबत जोडलं जावू लागलं. 

एवढंच नाही तर अर्जुन आणि सलमानची बहिण अर्पिता शर्मा देखील रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जातं. पण नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. आता अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहेत.