सलमान आणि जॅकी श्रॉफमध्ये या हिरोईनसाठी झालं होतं भांडण, 'राधे' सिनेमात सलमानने घेतला बदला

'राधे' या चित्रपटाला घेवून सध्या सलमान खानची जेवढी चर्चा होत नाही आहे तेवढी चर्चा या चित्रपटात हिरोईनचे भाऊ असलेले जॅकी श्रॉफ यांची होत आहे.

Updated: May 18, 2021, 04:38 PM IST
सलमान आणि जॅकी श्रॉफमध्ये या हिरोईनसाठी झालं होतं भांडण, 'राधे' सिनेमात सलमानने घेतला बदला

मुंबई : 'राधे' या चित्रपटाला घेवून सध्या सलमान खानची जेवढी चर्चा होत नाही आहे तेवढी चर्चा या चित्रपटात हिरोईनचे भाऊ असलेले जॅकी श्रॉफ यांची होत आहे. राधे सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते सातत्याने माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. जॅकी श्रॉफ प्रत्येक मुलाखतीमध्ये सलमान खानच्या त्या दिवसांबद्दल बोलत आहोत. जेव्हा सलमान दिग्दर्शक शशीलाल नायर यांचा असिस्टंट होता. जॅकी शशीलाल यांच्या चार चित्रपटात दिसले आहेत. पण जॅकी यांच्या समोर सलमान 'फलक' मध्ये दिसला होता. या दोघांमध्ये जरी खूप प्रेम असलं तरी, एक वेळ असा होता की दोघांचं खूप मोठं भांडण होण्यापासून वाचलं.

सलमान खान आणि जॅकी श्रॉफ यांची मैत्री खूप जूनी आहे. दोघांनामध्ये वयाच्या बाबतीत दहा वर्षांचं अंतर आहे, जॅकी श्रॉफ म्हणतात की, त्यांनी सलमानला नेहमीच आपल्या मुलासारखंच प्रेम दिलं. 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानही त्यांनी एक गोष्ट पुन्हा सांगितली होती जी आता 'राधे' या चित्रपटाच्या वेळीही जॅकी यांनी सांगून राग आल्याचं सांगितलं होतं.

या किस्स्याची सुरुवात जॅकी श्रॉफ आणि चित्रपट दिग्दर्शक शशीलाल नायर यांच्या सिनेमापासून झाली. शशीलाल नायर यांची मुलगी काश्वी देखील दिग्दर्शक आहे आणि दिग्दर्शक म्हणून तिचा पहिला सिनेमा 'सरदार का ग्रँडसन'

'नेटफ्लिक्सवर प्रदर्शित
असिस्टंट दिग्दर्शक म्हणून सलमानने 'परिवार', 'फालक' आणि 'क्रोध' या तीन चित्रपटांत काम केलं. 'फलक'च्या वेळी जॅकी श्रॉफ आणि सलमान खान जवळ आले होते. जॅकी श्रॉफ एक स्टार होते आणि सलमान युनिटचा असिस्टंट डायरेक्टर होता. हे खरं आहे की, त्या दिवसातही जॅकी यांनी सलमानवर खूप प्रेम केलं होतं. त्यानंतर ते दिवस पण लोकांनी पाहिले जेव्हा संगीता बिजलानीला घेवून या दोघांमध्ये वाद झाला होता.

'बंधन' चित्रपटाच्या सेटवर हा वाद इतका वाढला होता की वातावरण खूप गरम झालं होतं. वादाचे कारण म्हणजे 'त्रिदेव' हा चित्रपट होता. त्रिवेदचा राग बंधनच्या सेटवर काढण्यात आला होता. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी यांचे रोमँटिक गाणं एकत्र चित्रीत करण्यात आलं होतं.

1998साली रिलीज झालेल्या 'बंधन' हा चित्रपट ज्यांनी पाहिला आहे. त्यांना माहिती आहे की, या चित्रपटात सलमान खानने जॅकी श्रॉफच्या पत्नीच्या भावाची भूमिका साकारली आहे. 'जिजाजी बोलेंगे वो मैं करेगा' या चित्रपटाचा एक डायलॉग त्या दिवसांत चांगलाच गाजला होता. यानंतर जॅकी श्रॉफ या डायलॉगवरुन सलमानला टोमणे मारायचे.

'राधे' या सिनेमात जॅकी श्रॉफ सलमान खानच्या प्रेमात पडलेल्या मुलीचे भाऊ या भूमिकेत आहेत. या चित्रपटात 'बंधन'च्या एकदम ऊलट चित्र पहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या एन्डनंतर क्लायमेक्समध्ये पूर्ण झाल्यानंतर जेव्हा सलमान खान आणि जॅकी श्रॉफ एका लांब शॉटमध्ये एकत्र लांब जाताना दिसतात. यावेळी जॅकी श्रॉफ यांचा एक डायलॉग आहे, 'अच्छा, जीजे..!'

कमाईच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1998सालच्या सर्वाधिक 10  कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'बंधन' या चित्रपटाचा सामावेश आहे.  'सत्या', 'दिल से' आणि 'मेजर साहब' सारख्या चित्रपटांनीही त्यावर्षी जास्त कमाई केली आहे. 'बंधन' चित्रपटामध्ये रंभा आणि अश्विनी भावे व्यतिरिक्त सलमान खान आणि जॅकी श्रॉफ आहेत.