Bigg Boss 16 च्या पहिल्या स्पर्धकाची घोषणा, सलमानच्या घरात 'छोट्या भाईजान'ची एन्ट्री!

जगातील सर्वात छोट्या गायकाची Bigg Bossच्या घरात एन्ट्री

Updated: Sep 28, 2022, 12:06 AM IST
Bigg Boss 16 च्या पहिल्या स्पर्धकाची घोषणा, सलमानच्या घरात 'छोट्या भाईजान'ची एन्ट्री! title=

Abdu Rojik : टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो ठरलेल्या बिग बॉसचा 16 वा सिझन (Bigg Boss season 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रिअॅलिटी शोची रिलीज तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसं शोच्या स्पर्धकांची नावं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. मागील सिझनपेक्षा नवा सिझन जास्त प्रसिद्ध व्हावा, यासाठी सलमान अॅड टीम जोरात प्रमोशन करत आहेत. (Salman khan announced name of Abdu Rojik as first contestant of Bigg Boss season 16)

Bigg Boss च्या 16 व्या सिझनमध्ये कोण कोणते स्पर्धक असतील, याची जोरदार चर्चा मागील काही दिवसात होताना दिसली. त्यानंतर आता या नव्या सिझनच्या पहिल्या स्पर्धकाचं नाव आता समोर आलं आहे. खुद्द सलनामने या नावावर शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात छोट्या भाईजानची एन्ट्री झाली आहे.

छोटा भाईजान म्हणजे नक्की कोण?, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. हा छोटा भाईजान म्हणजे 'अब्दू रोजिक'. जगातील सर्वात छोटा गायक म्हणून ओळख असलेला हाच तो अब्दू रोजिक. मंगळवारी शोच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने (Salman khan announced the name of Abdu Rojik) अब्दू रोजिकची सर्वांनासमोर ओळख करून दिली.

सलमान खानने अब्दु रोजिकला (first contestant of Bigg Boss season 16) स्टेजवर बोलावलं. स्टेजवर येताच अब्दूने 'दबंग' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग मारला. 'स्वागत नहीं करोगे हमारा' असं म्हणत छोट्या भाईजानने एन्ट्री केली. त्यावेळी अब्दू रोजिकने बिग बॉसच्या घरात येण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं.

अब्दू रोजिक काय म्हणाला-

मला बिग बॉसच्या घरात जायला आवडेल. मी त्यासाठी उत्सुक देखील आहे. खुप जास्त उत्सुक आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. कृपया तुम्ही मला पाठिंबा द्या. मी तुमचा छोटा भाईजान आहे. कृपया माझ्यासोबत भांडू नका, मी तुमच्यावर प्रेम करतो, असं अब्दू रोजिक (Abdu Rojik) यावेळी म्हणाला आहे.

दरम्यान, अब्दू रोजिक एवढा छोटा असल्याने त्याला बिग बॉसच्या घरात कशी काय एन्ट्री करता येईल, असा सवाल अनेकांना पडल्याने सलमानने लगेच स्पष्टीकरण दिलं. अब्दू रोजिक लहान नसून तो 18 वर्षांचा आहे आणि तो बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी पात्र आहे, असं सलमान म्हणाला.