अफेअरच्या चर्चा सुरु असतानाच Salman Khan आणि Pooja Hegde चा फोटो व्हायरल

सलमान खान आणि पूजा हेगडे 'किसी का भाई, किसी की जान' चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यादरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता सलमान आणि पूजाचा एक फोटो व्हायरल झाला आहे.   

Updated: Feb 3, 2023, 01:44 PM IST
अफेअरच्या चर्चा सुरु असतानाच Salman Khan आणि Pooja Hegde चा फोटो व्हायरल

Salman Khan and Pooja Hegde: बॉलिवूडमध्ये सध्या सलमान खान (Salman Khan) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघेही लवकरच 'किसी का भाई, किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने दोघांमधील जवळीक वाढली असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर अद्यापही दोघांकडून अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेलं नाही. यादरम्यान सलमान खानचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोंमध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे एकत्र दिसत आहेत. 

पूजा हेगडेचा भाऊ ऋषभ हेगडे (Rishabh Hegde) नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे या लग्नाला सलमान खानने हजेरी लावली होती. सलमान खानने लग्नात उपस्थिती लावल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ट्विटरला अनेक फॅन्स अकाऊंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 

इतकंच नाही तर लग्नामध्ये पूजा हेगडेच्या कुटुंबाने संगीतदरम्यान सलमान खानच्या गाण्यावर डान्स केला. पूजा हेगडेसह कुटुंबाने सलमान खानच्या 'हम साथ साथ है' चित्रपटातील 'छोटे छोटे भाईंयो के बडे भैय्या' गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

सलमान खानने वर आणि वधूसोबत फोटो काढला.

संगीतमध्ये पूजा हेगडेच्या कुटुंबाने डान्स केलेला व्हिडीओ. 

याशिवाय सलमान खानने कार्यक्रमात पूजा हेगडे आणि इतरांसह काढलेला एक फोटोही फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

दरम्यान याआधी पूजा हेगडेने भावाच्या लग्नातील फोटो शेअर केले होते. "माझ्या भावाने त्याच्या आयुष्यातील प्रेमाशी लग्नगाठ बांधली आहे. हा आठवडा फारच उत्साहाने भरलेला होता. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि एका लहान मुलाप्रमाणे हसत होती. तुम्ही आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असताना तुम्हाला फार प्रेम मिळावं. शिवानी तुझं आमच्या कुटुंबात स्वागत आहे," अशी पोस्ट पूजाने शेअर केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

'किसी का भाई, किसी की जान' चित्रपटात सलमान आणि पूजा हेगडेसह वेंकटेश, शेहनाज गिल, पलक तिवारी आणि विजेंदर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. सलमान खान शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. याशिवाय बजरंगी भाईजान, किक, टायगर ३ चित्रपटांच्या सिक्वेलमध्येही तो झळकणार आहे.