close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रेक्षकांना मिळणार खऱ्याखुऱ्या 'चुलबूल पांडे'ला भेटायची संधी

स्वागतासाठी सज्ज आहात ना?

Updated: Oct 1, 2019, 04:36 PM IST
प्रेक्षकांना मिळणार खऱ्याखुऱ्या 'चुलबूल पांडे'ला भेटायची संधी

मुंबई : "स्वागत नहीं करोगे हमारा..." असे म्हणतं बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची दबंगगिरी चाहत्यांना लवकरच अनुभवता येणार. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. सलमान सध्या 'दबंग ३' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटाच्या चर्चा चांगल्याच रंगत. चित्रीकरणानंतर चित्रपटाची टीम प्रमोशनच्या कामाला लागते. परंतु 'दबंग ३' चित्रपटाचे प्रमोशन करायला सलमानने नकार दिला आहे. 

तर चित्रपटाचे प्रमोशन खुद्द 'चुलबूल पांडे' करताना दिसणार आहे. सध्या सलमानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे 'कमाल करते हो पांडे जी... जर संपुर्ण जगाच्या भावना चुलबूल सोबत जोडल्या आहेत, तर चित्रपटाचे प्रमोशन सलमान का करेल' अशाप्रकारचा व्हिडिओ सध्या इन्टरनेटवर चांगलाच गाजत आहे. 

'दबंग ३' चित्रपटाबरोबरच अर्जुन कपूरचा 'पानीपत' चित्रपट ६ डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्याचबरोबर १३ डिसेंबरला अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी' आणि २७ डिसेंबरला अक्षय-करिनाचा 'गुड न्यूज' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर कोणता चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.