काळवीट शिकार प्रकरण - 20 वर्षांंनंतरही पोलिस 'या' एका आरोपीला पकडू शकले नाहीत ..

1998 सालापासून काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानसह सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे यांच्यावर खटला सुरू होता. आज 20 वर्षांनंतर जोधपूर कनिष्ठ न्यायालयाने सलमान खानला दोषी तर अन्य कलाकारांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. 

Updated: Apr 5, 2018, 12:45 PM IST
काळवीट शिकार प्रकरण -  20 वर्षांंनंतरही पोलिस 'या' एका आरोपीला पकडू शकले नाहीत .. title=

मुंबई : 1998 सालापासून काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानसह सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे यांच्यावर खटला सुरू होता. आज 20 वर्षांनंतर जोधपूर कनिष्ठ न्यायालयाने सलमान खानला दोषी तर अन्य कलाकारांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. 

 किती वर्षांची शिक्षा होण्याचा अंदाज ? 

 ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची  शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.  सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

एका व्यक्ती लापता 

1998 सालापासून काळवीट शिकार प्रकरण सुरू आहे. यामध्ये सलमान खान सह अन्य सहा लोकांच्या विरोधात केस चालवण्यात आली आहे. यामध्ये सलमान खान प्रमुख आरोपी तर सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू या कलाकारांच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. मात्र आरोपींच्या यादीमध्ये अजून एका व्यक्तीचं नाव होतं. ट्रॅव्हल एजंट दुष्यंत सिंह आणि दिनेश गावरे या व्यक्तींचाही समावेश होता. हा ट्रॅव्हल एजंट आणि सलमानचा असिस्टंट होता. या प्रकरणामध्ये ट्रॅव्हल एजंटला अजून पोलिस पकडू शकलेले नाही.