काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियात memes चा पाऊस

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सेशन न्यायालयाने गुरूवारी ( 5 एप्रिल) पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सलमान खानची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान खानच्या वकिलांकडून आज जोधपूर उच्च न्यायालयामध्ये जामीन  मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  

Updated: Apr 6, 2018, 09:12 AM IST
काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियात memes चा पाऊस title=

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सेशन न्यायालयाने गुरूवारी ( 5 एप्रिल) पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सलमान खानची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान खानच्या वकिलांकडून आज जोधपूर उच्च न्यायालयामध्ये जामीन  मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  

जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न  

सलमान खान लवकर जेलबाहेर पडावा याकरिता त्याच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. याबाबतची सुनावणी आज सकाळी 10.30 च्या सुमारास होणार आहे. 

संमिश्र प्रतिक्रिया  

जोधपूर सेशन कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर सोशलमीडियामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये काहींनी सलमान खानला पाठिंबा दिला. तर काहींनी टीका केली. मात्र दरम्यान या प्रकरणी अनेकांनी त्यांच्या 'क्रिएटीव्हिटी'ला चालना देऊन मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

 

 कैदी नंबर 106 

 सलमान खानला जोधपूरच्या जेलमधील दोन नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. सलमान आता जोधपूर जेलमधील १०६ नंबरचा कैदी आहे. सलमान जेलमध्ये आल्यानंतर त्याचा बीपी थोडा वाढल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंग यांनी दिली. 

इतर कलाकारांची निर्दोष सुटका

दरम्यान, सलमानला शिक्षा झाली असली तरी सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू या चौघांची मात्र या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. मात्र, त्यांच्या सुटकेवर बिश्नोई समाजानं नाराजी व्यक्त केली. या निकालाविरोधात बिष्णोई समाज वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती बिष्णोई समाजाच्या नेत्यांनी दिलीय. त्यामुळं हे काळवीट शिकारी प्रकरण आणखी काही काळ न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे. तूर्तास सलमानला शुक्रवारी जामीन मिळणार की, टायगरला जेलमध्येच राहावं लागणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.