'या' कृतीतून झळकला सलमानचा देशाभिमान

पाकिस्तानी आयोजकांच्या भारत विरोधी भूमिकेमुळे सलमानने संपूर्ण शोच रद्द केला.

Updated: Feb 9, 2020, 10:03 AM IST
'या' कृतीतून झळकला सलमानचा देशाभिमान title=

मुंबई : पाकिस्तानी आयोजकांच्या भारत विरोधी भूमिकेमुळे सलमानने संपूर्ण शोच रद्द केला. हा शो अमेरिकेत होणार होता मात्र या शोचे आयोजक रेहान सिद्धीकीवर भारत विरोधी कारवायांसाठी निधी गोळा केल्याचा आरोप असल्याचे पाहून सलमानने हा शोच रद्द केला. सलमानचा हा निर्णय ऐकून चाहत्यांनी सलमानवर कौतुकाचा वर्षाव केलाय. 

रहमान सिद्दकी ह्यूस्टनमध्ये राहत आहे. याआधी देखील त्याने अमेरिकेत भारत विरोधी कारवायांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेव्हा देखील त्याने कार्यक्रमात निधी गोळा केला होता. आता तो अमेरिकेत म्यूझीकल शो आयोजित करणार आहे.

या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकार देखील उपस्थित राहणार आहे. तर या कार्यक्रमाचा विरोध करत सलमानने ट्विट केले आहे. 'जेव्हा प्रश्न देशाचा असतो तेव्हा सलमान चाहत्यांना अभिमान वाटण्याची संधी सोडत नाही. त्याने पुन्हा अमेरिकेतील कार्यक्रम रद्द केला. आयोजक रेहान सिद्धीकीवर भारत विरोधी कारवायांसाठी निधी गोळा केल्याचा आरोप असल्याचे पाहून सलमानने हा शोच रद्द केला.'  

ऑपइंडियाच्या रिपोर्टनुसार रेहान सिद्धीकीच्या कार्यक्रमात सैफ अली खान, मीका सिंग, पंकज उधास, आणि रॅपर बादशाह यांनी देखीस सादरीकरन केले आहे. तर दुसरीकडे सलमानने सिद्दकीच्या कार्यक्रमाला नकार दिल्यामुळे त्याच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

सलमान लवकरच 'राधे' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'राधे' चित्रपट २००९ साली आलेल्या 'वान्टेड' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. हा चित्रपट २०२०मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर तो 'इंशाअल्लाह' चित्रपटात झळकणार आहे.