Fact Check : सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; मुंबईच्या 'या' हॉटेलमध्ये घेतली प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सप्तपदी

सलमान खानने बांधली बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्नगाठ, होतायेत फोटो व्हायरल 

Updated: Feb 18, 2023, 10:01 PM IST
Fact Check : सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; मुंबईच्या 'या' हॉटेलमध्ये घेतली प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सप्तपदी  title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी सलमान खानने सोनाक्षी सिन्हासोबत लग्न केल्याची पुष्टी केली आहे. खरंतर, सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांनी लग्न केल्याचा दावा केला जात आहे.

सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या प्रेमात पडत आहेत. मात्र, या व्हायरल फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा फोटो फोटोशॉपवर एडिट करण्यात आल्याचं आढळून आलं. त्यामुळे या बातमीत तथ्य नाही.

सलमान आणि सोनाक्षीच्या व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सलमान  सोनाक्षीला अंगठी घालताना दिसत आहे. दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने झहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांचं खंडन करताना म्हटलं आहे की, "तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि जेव्हा आम्ही ही बातमी ऐकली तेव्हा आम्ही खूप हसलो कारण ही खूपच मजेदार बातमी होती."  

 सोनाक्षीने 2010 मध्ये 'दबंग' चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. अलीकडेच ही अभिनेत्री 'डबल एक्सएल'मध्ये दिसली होती. दोन्ही स्टार्सनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये 7 फेरे घेतल्याचंही सांगण्यात येत आहे, ही देखील पूर्णपणे अफवा असल्याचं म्हटलं जात आहे.