बैलगाडी, ट्रॅक्टरमधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतोय सलमान; पाहा व्हिडिओ

सलमानचा एक व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल होतोय.

Updated: May 4, 2020, 01:32 PM IST
बैलगाडी, ट्रॅक्टरमधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतोय सलमान; पाहा व्हिडिओ title=
फोटो सौजन्य : व्हिडिओग्रॅब

मुंबई : बॉलिवूड दबंग खान सलमान सध्या लॉकडाऊनमुळे त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवरच राहतोय. फार्म हाऊसवर राहत असताना सलमान इंडस्ट्रीतील मजूरांपासून ते पनवेलमधील अनेक गावांमध्ये राहणाऱ्यांसाठी मदत करतोय. सलमानचा एक व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सलमान लोकांची मदत करण्यासाठी मेहनत करताना दिसतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान बैलगाडी आणि ट्रॅक्टरमध्ये सामान लोड करत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक चाहते सलमानच्या कामाचं कौतुक करताना दिसतात. या व्हिडिओमध्ये सलमानसोबत यूलिया वंतुर आणि जॅकलिन फर्नांडिसही दिसतेय.

सलमानने हा व्हिडिओ शेअर करत, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मदत केलेल्या सर्वाचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये सलमान त्याच्या कुटुंबियांसोबत, जवळच्या मित्र-परिवारासोबत खाण्याचं सामान बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉलीमध्ये भरताना दिसतोय. 

याआधी देखील सलमानने 25000 मजूरांची मदत केली होती. त्याशिवाय त्यांना खाण्याचं महत्त्वाचं सामानही पाठवलं होतं. लॉकडाऊन असल्यामुळे सलमान त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकला आहे. त्याने यापूर्वी चाहत्यांना कोरोनाला हरवण्यासाठी घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. घरी राहून, सुरक्षित राहण्याबाबत सांगत त्याने एक व्हिडिओही शेअर केला होता.