लैंगिक शोषण अन् सिगारेटनं चटके, Salman Khan वर एक्स गर्लफ्रेंडचे धक्कादायक आरोप

अभिनेत्री Somy Ali नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमान खानवर हे गंभीर आरोप केले आहेत. 

Updated: Dec 2, 2022, 11:02 AM IST
लैंगिक शोषण अन् सिगारेटनं चटके, Salman Khan वर एक्स गर्लफ्रेंडचे धक्कादायक आरोप

Salman Khan Ex Girlfriend Somy Ali : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) एकेकाळी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, सोमी अलीनं नुकतंच सलमानवर गंभीर आरोप केले आहेत. सोमीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत हे आरोप केले आहेत. लक्षवेधी गोष्टी म्हणजे सोमीनं सलमानचे नाव घेतले नाही मात्र, त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. सोमी अलीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

सोमीनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलमान तिला फुलं देताना दिसत आहे. मात्र, आता सोमीच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर जाऊन पाहिलं तर तिची ही पोस्ट दिसत नाहीये. सोमीनं शेअर केलेली ही पोस्ट काही क्षणातच तिनं डिलीट केली. तिनं सलमानवर असा आरोप केला की या अभिनेत्यानं केवळ तिचा भारतातील शोच बंद केला नाही तर तिला तक्रार करण्याची धमकीही दिली. सोमीनं नाव न घेता सलमानवर तिला सिगारेटने चटका देत जाळल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे.

पाहा काय म्हणाली सोमी अली 

सोमी अलीच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सोमी अली पाकिस्तानात राहत होती, पण सलमान खानसाठी ती मुंबईत आली. येथे आल्यानंतर सोमी अलीनं सलमानसोबत एक चित्रपटही केला आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. सोमी अली आणि सलमान हे 1991 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले आणि 1998 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.

हेही वाचा : Nora Fatehi ने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून भडकले नेटकरी; Video Viral

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी पुन्हा फ्लोरिडाला गेली आणि एनजीओ चालवू लागली. आता सोमीनं पुन्हा एकदा सोमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. अजून खूप काही येणार आहे. भारतात माझ्यावर बंदी आणली आणि नंतर मला खटला दाखल करण्याची धमकी दिली. तू एक घाबरट व्यक्ती आहेस, तुझ्या वकिलांना काढून टाक. माझ्या संरक्षणासाठी माझ्याकडे 50 वकील आहेत, तू जे माझं अनेक वर्षे शारीरिक शोषण केलं, मला सिगारेटनं चटके दिले.  

Salman Khan Ex Girlfriend Somy Ali Again Attacks And Abuses Him Saying He Burnt Her With Cigarette Physically Abused then deleted the post

या पोस्टमध्ये सोमीनं काही अपशब्दही वापरले आहेत. यासोबतच त्या अभिनेत्रींनाही टार्गेट करण्यात आले आहे, ज्या सलमानला सपोर्ट करत आहेत. जे पुरुष महिलांची मारहान करतात त्यांचे समर्थन करणाऱ्या महिलांना लाज वाटली पाहिजे. आता लढण्याची वेळ आली आहे. सोमीने नंतर तिची ही पोस्ट डिलीट केली. पण तिच्या पोस्टचे स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोमी अली एकेकाळी स्वत:ला सलमान खानची मोठी फॅन म्हणायची आणि आज ती त्याच्यावर आरोप करत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत सोमीने सलमानसोबतच्या ब्रेकअपचे कारणही सांगितले होते. त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगत सलमाननं तिची फसवणूक केल्याचे सांगितले.