Nora Fatehi ने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून भडकले नेटकरी; Video Viral

'उलटा तिरंगा पकडलास, डोक्याने कमी आहेस का ग तू नोरा..', अभिनेत्रीने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून संतापले नेटकरी.. नोराच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा   

Updated: Dec 2, 2022, 10:36 AM IST
Nora Fatehi ने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून भडकले नेटकरी; Video Viral

Nora Fatehi New Video : अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिच्या डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यासाठी कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कपसाठी (FIFA World Cup 2022) नोराला डान्स करण्याची संधी देण्यात आली. तेव्हा आपल्या डान्सने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या नोराने तिरंगा फडकवत 'जय हिंद' असे नारे देखील लावले. पण असं करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. नोराने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून नेटकरी प्रचंड संतापले आहेत. (nora fatehi dance)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नोराने तिरंगा उलटा पकडला आहे. नोराने तिरंग्याचा केलेला अपमान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याच कारणामुळे नोराला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (nora fatehi -FIFA World Cup)

व्हिडीओमध्ये स्टेजवर पडलेला तिरंगा उचलून एखाद्या ओढणीप्रमाणे तिरंग्याला हाताळताना नोरा दिसत आहे. त्यानंतर नोराने तिरंगा अन्य व्यक्तीच्या हातात दिल्यामुळे दिली अभिनेत्रीची टीका होत आहे . सध्या नोराचा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण संतापत आहे. (Nora Fatehi New Video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट देखील केल्या आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, 'उलटा तिरंगा पकडलास, डोक्याने कमी आहेस का ग तू नोरा..' तर अन्य युजरने तिरंग्याचा पहिला रंग केशरी आहे, अशी अभिनेत्रीला आठवण करून दिली. (nora fatehi holding national flag in wrong way)

दरम्यान, 'गर्मी', 'दिलबर दिलबर', 'कुसू-कुसू' एका एकापेक्षा एक गाण्यांवर भन्नाट डान्स (Bollywood Latest News Today) करणारी नोरा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला पाहून नेटकरी संतापले आहेत.