salman khan सोबत munmun dutta चं काय कनेक्शन, त्या कॉलनंतर एकच चर्चा?

या शोला भारतात खूप प्रेम दिलं जातं आहे.

Updated: Jan 8, 2022, 12:54 PM IST
 salman khan सोबत munmun dutta चं काय कनेक्शन, त्या कॉलनंतर एकच चर्चा?  title=

मुंबई : भारतात चित्रपटांना जितके महत्त्व आहे, तितकेच टेलिव्हिजन शोला देखील आहे. याचे कारण म्हणजे काही लोकांना रात्री कार्यक्रम पाहायला आवडतात. यासोबतच गृहिणी दिवसभराच्या घरकामाला कंटाळल्यानंतर रात्री सास बहू का किंवा एखादा कॉमेडी शो बघणं पसंत करतात.

टेलिव्हिजनवर अनेक शो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. पण त्यातील एक शो जो रात्रीच्या वेळी भारतातील प्रत्येक घरात पाहिला जातो, तो म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. 

या शोला भारतात खूप प्रेम दिलं जातं आहे आणि याच कारणामुळे हा शो गेल्या 13 वर्षांपासून सुरू आहे. या शोबद्दल बोलायचे झाले तर, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या काही काळापासून हा शो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामुळे प्रत्येकजण या शोबद्दल बोलत आहे.  या शोचे प्रसिद्ध कलाकार एक एक करून शो सोडत आहेत आणि शोच्या निर्मात्यांसाठी ही एक मोठी समस्या आहे. कारण शोमधील प्रत्येक पात्राचे स्वतःचे महत्त्व आहे.

त्यात नुकतीच शोसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. या शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताने या शोला जवळपास अलविदा केला आहे. त्याच कारण म्हणजे मुनमुन दत्ताला कोटींची ऑफर आली आहे. आणि ही ऑफर तिला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने दिली आहे. मुनमुन दत्ताला सलमान खानने या ऑफरच्या संदर्भात फोन केला होता, असं बोललं जात आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये बबिता जीची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे, त्यामुळे प्रत्येकजण तिच्याबद्दल बोलत आहे. बबिताची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीला अलीकडेच सलमान खानच्या बाजूने बोलावण्यात आले आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Babita Ji aka Munmum Dutta in trouble,  case against actress for using 'casteist slur' | Television News | Zee News

 बबिताला सलमान खानने बिग-बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची ऑफर दिली आहे. बबिताला वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे शोमध्ये बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे सलमान खानच्या शो बिग बॉसमध्ये बबिता झळकण्याची शक्यता आहे. आणि यासाठी तिला कोटींची ऑफर दिली आहे. 

बबिताने शोमध्ये भाग घेतला आहे आणि ती आता बिग बॉसच्या घरात आहे.अशी देखील माहिती समोर येत आहे. पण या शोसाठी मुनमुन दत्ताने तारक मेहता का उल्टा चष्मा शो कायमचा सोडला आहे की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण तिच्या बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीबाबत एकच चर्चा रंगताना दिसत आहे.