Salman Khan lifestyle : एकटा जीव.. सलमान लक्झरी कार आणि करोडोंच्या संपत्तीचा मालक, जाणून व्हाल थक्क

सलमानच्या खासगी आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी 

Updated: Sep 22, 2021, 09:13 AM IST
Salman Khan lifestyle : एकटा जीव.. सलमान लक्झरी कार आणि करोडोंच्या संपत्तीचा मालक, जाणून व्हाल थक्क

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानला कोणत्या ओळखीची गरज नाही. दबंग, सुल्तान, बजरंगी भाईजान आणि वाँटेड सारखे हिट सिनेमे देणाऱ्या सलमानला आताची पिढी सर्वाधिक पसंत करते. आपल्या दमदार अभिनयामुळे सलमानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर देखील हिट ठरतात. सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सलमानची लाईफस्टाईल देखील अनेक जण फॉलो करतात. 

असं ठेवतो स्वतःला फिट 

सलमान खान आता 55 वर्षांचा आहे. मात्र तो स्वतःला फिट ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतो. एका मुलाखतीत सलमानने सांगितलं की, तो अगोदर सगळं खायचा मात्र आता त्याने आपल्या खाण्याकडे विशेष लक्ष दिलं आहे. आपलं वजन वाढू नये म्हणून तो फक्त हेल्दी फूडच खातो. तसेच वर्कआऊटकडे देखील तो विशेष लक्ष देतो. जिम जातो, सायकलिंग करतो तसेच स्विमिंग देखील करतो. 

सलमानला खाण्यात या गोष्टी सर्वाधिक आवडतात

सलमान खानला खाण्यात चिकन बिर्याणी आणि राजमा चावल आवडतात. त्याला मोदक आणि कबाब खाणे देखील आवडते. सलमान नाश्त्यासाठी चार अंड्यांचा पांढरा भाग आणि कमी चरबीयुक्त दूध घेतो. तो दुपारी मटण, तळलेले मासे, कोशिंबीर आणि फळे खातो. दुसरीकडे, रात्रीच्या जेवणासाठी त्याला चिकन, सूप, उकडलेल्या भाज्या आणि मासे खाणे आवडते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अशी आहे सलमानची कमाई 

सलमान खानच्या कमाईबाबत सूत्र सांगतात, तो बॉलिवूडमध्ये जाहिरातीतून, ब्रँड प्रमोशनमधून, गुंतवणूकीतून आणि सोशल मीडियाद्वारे तसेच चित्रपटातून पैसे कमवतो. एकीकडे त्याचा स्वतःचा बीइंग ह्यूमन ब्रँड आहे, तो इतर अनेक ब्रँडचा ब्रँड ऍम्बेसेडर आहे आणि यासाठी त्याची फी 8-10 कोटींपर्यंत आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान एका चित्रपटासाठी 60 कोटी रुपये घेतो.

घर नाही तर सलमान खानचा राजमहल 

सलमान मुंबईत त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, जे राजवाड्यापेक्षा कमी नाही. येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि येथे त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत राहते. मुंबईतील या अपार्टमेंटशिवाय, सलमानने 2017 मध्ये पाच बीएचके बंगलाही खरेदी केला. याशिवाय त्यांचे पनवेलमध्ये फार्म हाऊस देखील आहे. तसेच सलमान खानची दिल्ली, नोएडा आणि चंदीगड सारख्या ठिकाणीही भरपूर मालमत्ता आहे.

असं आहे कार कलेक्शन

सलमान खानलाही गाड्यांचा शौक आहे आणि त्याच्याकडे अनेक आलिशान आणि महागड्या कार आहेत. त्याच्याकडे ऑडी, बेंटले, रोल्स रॉयल आणि मर्सिडीज अशा अनेक कार आहेत. ज्याची एकूण किंमत 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.

एवढी आहे संपत्ती 

सलमान एक यशस्वी अभिनेता आहे. अशा परिस्थितीत त्याने भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी देखील मिळवली आहे. सलमानकडे सुमारे $ 360 दशलक्ष म्हणजे 2304 कोटी रुपये आहेत.