Salman Khan on Aamir Khan Daughter: सलमान खान हा कायमच आपल्या मित्रांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची नेहमीच चर्चा ही रंगलेली असते. आपल्या सहकलाकारांचे तो नेहमीच कौतुक करताना दिसतो. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावरही त्याच्या या पोस्ट चर्चेत असतात. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी त्यानं आमिर खानची लेक आयरा खानबद्दल खास गोष्ट शेअर केली. आपल्या इन्टाग्रामवरून त्यानं ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं काय लिहिलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. चला तर या लेखातून आपण पाहूया. आमिर खान आणि सलमान खान हे एकमेकांना समवयस्क आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक पातळीवरही स्पर्धा रंगलेली पाहायला मिळाली होती. परंतु वास्तवात मात्र ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
आपल्याला माहितीच आहे की आमिर खानची मुलगी ही मानसिक आरोग्यावर जनजागृती करते. स्वत: क्लिनिकल डिप्रेशनची शिकार झालेली आमिर खानची लेक फार मोठ्या स्तरावर हे काम करताना दिसते आहे. सोशल मीडियावरही ती याचे अपडेट्स देताना दिसते. त्यामुळे तिची विशेष चर्चा ही रंगेलली असते. सध्या ती तिच्या लग्नाच्या चर्चांमध्येही आहे. मध्यंतरी तिचा आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांचा एक जीममधला व्हिडीओ हा व्हायरल झाला होता. त्यावरून त्या दोघांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यांचा हा व्हिडीओ प्रचडं व्हायरल झाला होता. जीममध्ये व्यायाम करताना ते दोघं एकमेकांना बॅक टू बॅक कीस करत होते. त्यामुळे त्यावरून ती चांगलीच ट्रोल झाली होती.
हेही वाचा : परफेक्शनिस्टला जोकर का म्हणू लागले चाहते? आमिरचा लूक किती बदललाय पाहिलं?
यावेळी आयरा खानचं मानसिक आरोग्यावरील जनजागृतीचे काम पाहून सलमान खाननं तिचं कौतुक केलं आहे. यावेळी सलमान खाननं लिहिलं आहे की, 'कमाल आहे यार मुलं किती लवकर मोठी होतात. खूप स्ट्रॉन्ग होतात. त्यातून फार समजूतदारही आहे. देव तुझं भलं करो.'

सध्या सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाचा पहिला लुक हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. सध्या आमिर खानची लेकही आपल्या या नव्या कामात व्यस्त आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.