VIDEO : सलमान खानने Independence Day च्या दिवशी दिलं खास गिफ्ट

रिलीज केला 'भारत'चा टीझर

VIDEO : सलमान खानने Independence Day च्या दिवशी दिलं खास गिफ्ट  title=

मुंबई : सलमान खानचा सिनेमा 'भारत' अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. मग ते सिनेमाच स्टारकास्ट असो की त्याचं शुटिंग लोकेशन. भारत हा सिनेमा अगदी पहिल्यापासूनच चर्चेत राहिला आहे. स्वातंत्र्य दिवसानिमित्त सलमान खानने याचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा सिनेमा तयार होत आहे. या टीझरमध्ये सलमान खानने कोणताही सिनेमाचा भाग दाखवलेला नाही पण यामध्ये त्याचा आवाज ऐकू येतो.  

टीझरमध्ये सलमान खानचा आवाज ऐकू येतोय. बाबूजी कहते थे,  कुछ रिश्‍ते जमीन से होते हैं और कुछ रिश्‍ते खून से. मेरे पास दोनों ही थे. असं या टीझरमधून ऐकू येतं. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बाज जफर करत आहेत. तसेच सलमान खानचा बहिणीचा नवरा अतुल अग्निहोत्री आणि भूषण कुमार प्रोड्यूस करत आहे हा सिनेमा. ईदच्या दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

सलमान खानच्या या सिनेमात प्रियंका चोप्रा दिसणार आहे. मात्र सिनेमाचं शुटिंग सुरू झाल्यानंतर प्रियंकाने अचानक हा सिनेमा करण्यास नकार दिला आहे. तसेच सलमान खानसोबत आता कतरिना कैफ दिसणार आहे. यासोबतच पटानी, तब्बू आणि सुनील ग्रोवर देखील या सिनेमांत दिसणार आहे.