Salman Khan with Ronaldo : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'टाइगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटातील गाणं तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या सगळ्यात सलमान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सलमान हा लोकप्रिय फूटबॉलपटू क्रिस्टियामो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जीया रोड्रिग्जसोबत बसल्याचे पाहायला मिळत आहे. हे तिघेही बॉक्सिंग मॅच पाहण्यासाठी पोहोचले होते.
रियादमध्ये टायसन फ्यूरी आणि फ्रांसिस नगनौ यांच्यात झालेल्या बॉक्सिंग मॅच पाहण्यासाठी सलमान पोहोचला होता. त्यानं फुटबॉलर क्रिस्टियामो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया रोड्रिग्जसोबत मॅच पाहताना दिसला. सलमान आणि रोनाल्डोचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला आहे. व्हिडीओ समोर येताच त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत या मॅचमध्ये ते दोघे किती तल्लिन झाले आहे हे पाहायला मिळत असल्याच्या कमेंट केल्या आहेत.
हा व्हिडीओ पाहता त्यावर रिअॅक्ट करत चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'अप्रतिम फुटबॉलर आणि अप्रतिम अभिनेता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भाईजान आणि क्रिस्टियानो रोनाल्डोसोबत, मज्जा आली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भाईजानचा जलवा आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला 'पिक ऑफ द इयर.' दुसरा नेटकरी म्हणाला,'सिंगल वर्सेस मी'
हेही वाचा : मी आयुष्यात कधी तुमच्यासह काम करणार नाही, अभिनेत्याने धर्मेंद्र यांच्या तोंडावर सांगितलं, पण अखेर त्याला...
दरम्यान, चित्रपटा विषयी बोलायचे झाले तर दिग्दर्शन हे मनीष शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'टाइगर 3' चा बजेट हा 300 कोटींचा आहे. हा चित्रपट यशराज फिल्मसचा आता पर्यंतचा सगळ्यात महागडा चित्रपट आहे. चित्रपटाच्या व्हिएफेक्ससाठी खूप जास्त खर्च करण्यात आला आहे. हा चित्रपट आधी 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक था टाइगर' आणि 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टाइगर जिंदा है' या फ्रेन्चायझीमधील तिसरा भाग आहे. तर हा YRF च्या स्पाय यूनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. या आधी 2019 मध्ये ऋतिक रोशन, टाइगर श्रॉफ आणि वाणी कपूर यांचा 'वॉर' आणि याच वर्षी शाहरुख खानचा 'पठाण' प्रदर्शित झाला.
LIVE|
NZ
255/5(20 ov)
|
VS |
IND
145/8(16.2 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 130/7
|
VS |
MAS
128(19.5 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 2 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.