मुंबई : 'कंपनी' सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर 'रोड', 'पॉवर' या सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आम्ही बोलत आहोत विवेक ओबेरॉयबद्दल, ज्याने 2010 मध्ये या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबरला प्रियंका अल्वाला जोडीदार म्हणून निवडले होते. मात्र, प्रियांकाच्या आधी एकदा विवेक ओबेरॉयचे हृदय तुटले होते. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला विवेक ओबेरॉयच्या लव्ह लाईफची ओळख करून देत आहोत.
विवेक ओबेरॉय अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने त्याच्या पहिल्या चित्रपटातूनचं खूप प्रसिद्धी मिळवली. मात्र, त्यानंतर त्याची कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. 3 सप्टेंबर 1976 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेला विवेक ओबेरॉय प्रसिद्ध अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे. राम गोपाल वर्मा यांच्या फिल्म कंपनीमधून विवेकने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. यानंतर तो 'रोड' आणि 'दम' अशा चित्रपटांमध्ये दिसला. त्याचबरोबर त्याने साथिया, मस्ती, युवा, किसना: द वॉरियर पोएट, ओंकारा, शूटआउट अॅट लोखंडवाला, मिशन इस्तंबूल, प्रिन्स, रक्त चरित्र, किस्मत लव पैसा दिल्ली आणि क्रिश 3 इत्यादी चित्रपटांमध्येही आपला दमदार अभिनय दाखवला.
कामासोबतच विवेक ओबेरॉय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. खरंतर, ऐश्वर्या रायसोबतच्या त्याच्या अफेअरच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. असं म्हटलं जातं की, जेव्हा हे नातं पुढे जात होतं तेव्हा सलमान खानने विवेकला धमकी दिली होती, त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं. ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ओबेरॉय उद्ध्वस्त झाला. काही काळासाठी त्याने स्वतःला फिल्मी जगापासून दूर केलं.
अशा प्रकारे प्रियांकाने त्याच्या मनावर राज्य केलं.
ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ओबेरॉयने कोणालाच भेटणे बंद केलं होतं. अशा परिस्थितीत त्याने लवकरात लवकर लग्न करून आपला भूतकाळ विसरावा, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. अशा परिस्थितीत त्यांनी विवेकला फ्लोरेन्समध्ये प्रियंका अल्वाला भेटायला सांगितलं, जी कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. सुरुवातीला विवेक यासाठी तयार नव्हता. अशा परिस्थितीत त्याच्या आईने त्याला प्रियांकाला वर्षभर डेट करायला सांगितलं. मात्र, विवेक जेव्हा प्रियांकाला फ्लोरेन्समध्ये भेटला तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. यानंतर विवेकने वर्षभरही वाट न पाहता २०१० मध्ये प्रियांकासोबत लग्नगाठ बांधली.