डेजी शाहची 'रेस 3' मधील ओळख देताना सलमान खान म्हणाला ...

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान लवकरच 'रेस 3' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून सलमान खान 'रेस 3' मधील त्याच्या सहाकालांच्या भूमिका, व्यक्तिरेखा यांची त्याच्या चाहत्यांना भेट करून देत आहे.  

Updated: Mar 22, 2018, 09:56 PM IST
डेजी शाहची 'रेस 3' मधील ओळख देताना सलमान खान म्हणाला ...  title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान लवकरच 'रेस 3' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून सलमान खान 'रेस 3' मधील त्याच्या सहाकालांच्या भूमिका, व्यक्तिरेखा यांची त्याच्या चाहत्यांना भेट करून देत आहे.  

रेस 3 ची दमदार टीम  

'रेस 3' या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान 'सिकंदर'च्या भूमिकेत झळकणार आहे. 'सिकंदर'ची भेट पोस्टरच्या माध्यमातून त्याने करून दिली आहे. त्यापाठोपाठ जॅंकलीन फर्नांडिस 'जेसिका', बॉबी देओल 'यश' व्यक्तीरेखांमध्ये दिसणार आहे. यंदाच्या आठवड्यामध्ये सलमान खान रेस 3 च्या टीमशी ओळख करून देत आहे. 'रेस3'मध्ये सलमान दिसणार 'या' खास अंदाजात

डेजी शाहची खास ओळख  

'रेस 3' मध्ये डेजी शहा 'संजना'ची भूमिका साकारणार आहे. तिची ओळख करून देताना 'संजना धमाका करण्याची वाट पाहत आहे.' अशी खास कॅप्शन दिली आहे. 

 

अ‍ॅक्शन फिल्मचं शूटींग परदेशामध्ये 

रेस 3 चित्रपटामध्ये काही अ‍ॅक्शन सिक्वेन्स  आहेत. या सिक्वेन्सचं शूटिंग अबुधाबीमध्ये सुरू आहे. यासाठी सरेच कलाकार मेहनत आणि रिहर्सल करत आहेत.  

 15 जूनला रीलीज होणार चित्रपट  

कोरिओग्राफर रेमो डिसुजा 'रेस 3' चं दिग्दर्शन करणार आहे. 'रेस'च्या सिक्वेलमध्ये सलमान खान पहिल्यांदा झळकणार आहे. अभिनेते अनिल कपूर यांनीदेखील ट्विट करून 'सिकंदर हा पहिला रेसर...' असे म्हणत ट्विट केलं आहे. सलमान खानने देखील या आठवड्यात 'रेस3' च्या परिवारातील मंडळीशी तुमची ओळख करून देतो असे ट्विटरवर लिहले आहे.