मुंबई : सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा अनेकजण सोशल मीाडियावर एका रात्रीत स्टार होतात. तर अनेक स्टार याच सोशल मीडियामुळे चर्चेत येतात. तर याच सोशल मीडियामुळे बरेचजण अडचणीत येतात. याचच एक उदाहरण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा भूतकाळ सर्वांनाच माहीत आहे. पण आजकाल त्यांचा असाच एक 'फॅमिली फोटो' व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. पण या व्हायरल फोटोमागचं सत्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हायरल होणारा हा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र हा फोटो पाहून तंत्रज्ञान कसं फसवू शकतं हे या फोटोमुळे तुम्हाला समजेल. व्हायरल व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन, त्याची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचा एक फोटो अशा प्रकारे एडिट करण्यात आला आहे की, पाहणाऱ्यांना धक्काच बसत आहे.
कमेंट्सचा वर्षाव
व्हायरल होणाऱ्या या फोटोत अभिषेकच्या जागी सलमानला बसवलं आहे. यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एडिट केलेल्या फोटोचा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला कमेंट करत एकाने लिहिलं की, सलमानला तुमचा पत्ता जाणून घ्यायचा आहे, तर अजून एकाने लिहिलंय की, की वाह भाऊ, तुम्ही चमत्कार केला. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर युजर्स करत आहेत. तर अनेकांनी मात्र यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हे अत्यंत चुकीचं असल्याचं सांगितलंय.
अनेकांचं असं म्हणणं आहे की, मुलीला या प्रकरणात गुंतवणं सर्वच बाबतीत चुकीचं आहे. प्रत्येकजण आपापल्या दृष्टीकोनातून याकडे पाहत आहे. मात्र नव्या युगातील तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या जगात कोणाचंही वैयक्तिक आयुष्य सुरक्षित नसल्याचं या व्हिडीओतून स्पष्ट झालं आहे.
गेल्या काही दशकांमध्ये सलमान-ऐश्वर्याचं नातं बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय लव्हस्टोरीमध्ये निश्चितच लक्षात राहतं. दोघांच नातं जितकं चर्चेत होतं तितकच त्यांचं ब्रेकअपही चर्चेत होतं. आता त्यांचं तुटून बरेच वर्ष झाली असली तरिही अनेकदा त्यांच्या नात्याची चर्चा ही होतेच. अनेक वर्षांनंतरही प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरूच असते. या कटू ब्रेकअपची कहाणी अजूनही सलमान-ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी आणि मीडियासाठी चर्चेचा विषय आहे.
अशा परिस्थितीत अनेकवेळा त्यांचे जुने फोटो, व्हिडिओ आणि अशा फोटोशॉप केलेले आणि एडिट केलेले फोटो व्हिडीओही अनेकदा इंटरनेटवर खळबळ उडवून देतात. लवकरच सलमान खानच्या पुढील रिलीज टायगर 3ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे चाहते ऐश्वर्याच्या पुढच्या चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत आहेत, जी शेवटची पोनियिन सेल्वन 2 मध्ये दिसली होती.
|
OMA
(20 ov) 225/5
|
VS |
SL
120/9(20 ov)
|
| Sri Lanka beat Oman by 105 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SL
(20 ov) 225/5
|
VS |
OMA
120/9(20 ov)
|
| Sri Lanka beat Oman by 105 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 196/6
|
VS |
ENG
166(19 ov)
|
| West Indies beat England by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.