मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आपल्या चॅट शो पिंचमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच या शोचा दुसरा सीझन सुरू झाला आहे. अरबाज खानच्या कार्यक्रमाचा पहिला गेस्ट म्हणजे त्याचा भाऊ आणि अभिनेता सलमान खानने हजेरी लावली आहे. अरबाज खानच्या कार्यक्रमात पोहोचल्यानंतर सलमान खानने आपल्या फिल्मी करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.
अरबाजने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पिंच 2च्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्याने सलमान खान आपला मोठा भाऊ असल्याचं वर्णन केलं आहे. व्हिडिओ प्रोमोमध्ये सलमान खानने सोशल मीडियावरील आपल्या विरोधात कमेंन्ट करण्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणाला की, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यावर तो कधीही लाईक्स आणि कमेंट्स पाहत नाही.
यानंतर, व्हिडिओमध्ये अरबाज खानने सोशल मीडिया युजर्सच्या कमेंन्ट वाचल्या आणि तो म्हणाला की, 'सलमान खान आमचे पैसे घेवून मस्त सेटल झाला आहे आमचे पैसे परत कर'. यावर सलमान खान आपल्या उत्तरात म्हणाला, 'पैसे नाही चोरले, कदाचित हृद्य चोरलं असेन. दुसरीकडे, अरबाज खान दुसर्या कमेंट वाचतो आणि म्हणतो, एका युजर्सने लिहिलं आहे की, 'सलमान खान दिखाव्यांचा अभिनय करण्यात तज्ज्ञ आहे.' यावर दबंग खाननेही उत्तम प्रतिसाद दिला आहे.
तो त्याच्या उत्तरात म्हणतो की, 'ठीक आहे, तुम्हीही करा. या अभिनयाला देखील खूप मोठं हृद्य लागतं याशिवाय सलमान खानने आपल्या फॅमिलीबद्दलही बर्यापैकी चर्चा केली. यापूर्वी पिंच 2 चा प्रोमो रिलीज झाला होता. ज्यामध्ये सलमान खान एका युजर्सची कमेंन्ट वाचल्यानंतर म्हणतो, 'त्याने माझ्या पोस्टमध्ये काय पाहिलं की आमचं घर कसं चुकतं आहे हे समजतं.'
Shooting or having fun, it's the same with 'Bade Bhaiya' on the sets!
Watch the first episode of Pinch Season 2 on 21st July 2021.❤️EP#1 Teaser Link - https://t.co/hj165r46Xw@QuPlayTv @quickheal @ZEE5India @PolycabIndia@aamwalla @BreezePowai @MYFMI @officialjoshapp
— Arbaaz Khan (@arbaazSkhan) July 19, 2021
अरबाज खानचा चॅट शो 'पिंच' हा सर्वात लोकप्रिय शो आहे. बरेच चित्रपट स्टार या शोमध्ये पोहोचतात आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक खुलासे करत असतात. अरबाज बॉलिवूड स्टार्सबरोबर सोशल मीडियाबद्दल स्पष्टपणे बोलतो. या शोमध्ये, स्टार लोक त्यांच्याविरूद्ध बोलणार्या कमेंन्टवर आपला अभिप्राय देतात.