सलमानच्या आगामी चित्रपटात दिशाची वर्णी

'भारत' चित्रपटात दिशाने अगदी छोटी भूमिका साकारली होती

Updated: Oct 15, 2019, 04:32 PM IST
सलमानच्या आगामी चित्रपटात दिशाची वर्णी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. चर्चा तिच्या खाजगी जीवनावर आधारित नाही तर तिच्या आगामी चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दिशा अभिनेता सलमान खानच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमानच्या बहुप्रतिक्षीत 'राधे: इंडियाज मोस्ट वान्टेड कॉप'मध्ये दिशा झळकणार आहे. 

राधे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रेभूदेवाच्या खांद्यावर आहे. पहिल्यांदा दिशा आणि सलमान 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र झळकले होते. आता हे दोघे पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

'भारत' चित्रपटात दिशाने अगदी छोटी भूमिका साकारली होती, कारण मुख्य भूमिकेत अभिनेत्री कतरिना कैफ झळकली होती. परंतु दिशावर चित्रीत करण्यात आलेला 'स्लो मोशन' गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.