मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) चा 16 जुलै रोजी 38 वा वाढदिवस साजरा केला. कतरिनाला तिच्या या खास दिवशी अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे सलमान खानने दिलेल्या शुभेच्छांची. (Salman Khan wishes Katrina Kaif lots of Love on her birthday )
सलमान-कतरिना यांची खास बॉन्डिंग आहे. अनेकदा हे दोघे एकमेकांसोबत दिसतात. चाहते देखील या दोघांना पसंत करतात. अनेकदा युझर्स सलमान खान आणि कतरिनाला लग्न करण्याचा सल्ला देतात. सलमान खानने आपली अगदी जवळची मैत्रिण कतरिनाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमान खानने शुक्रवारी एक फोटो पोस्ट करत कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिना कैफ या फोटोत सलमान खानचा माइक सरळ करताना दिसत आहे. या फोटोत दोघं एकमेकांकडे बघत आहेत. 'आपल्याला शानदार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. कतरिना' आपल्या आयुष्यात भरपूर प्रेम असणारा आरोग्यदायी श्रीमंत ज्ञानी वाढदिवस.
सलमान खानने ही पोस्ट केल्यानंतर युझर्सने आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. सलमान आणि कतरिना यांच्यावर चाहत्यांनी खूप प्रेम केलं. पण कतरिना आणि आणखी एका बॉलिवूड कलाकाराच्या नावाची चर्चा आहे. अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता विकी कौशल सोबत ती रेलेशनशीपमध्ये ती आहे असं म्हटलं जातं आहे. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट ही करण्यात आलं आहे