लूलियासह सलमानची सायकल राईड व्हायरल

सोशल मीडियावर त्यांच्या या सायकलस्वारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Updated: Jun 13, 2019, 01:23 PM IST
लूलियासह सलमानची सायकल राईड व्हायरल

मुंबई : चित्रपटांच्या वेळापत्रकातून स्वत:साठी वेळ काढण्याला सलमान नेहमीच प्राधान्य देतो. यामध्ये अनेकदा तो पनवेलच्या त्याच्या फार्महाऊसवर जातो किंवा मग मित्रांसोबत वेळ व्यतीत करतो. पण, या साऱ्यामध्ये तो विशेष प्राधान्य देतो ते म्हणजे सायकल चालवण्याला. घरी असताना मोकळ्या वेळात मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवणारा सलमान अनेकांसाठी तसा जुनाच आहे. पण, यावेळी मात्र हा सायकलस्वार सलमान चर्चेत आला आहे ते म्हणजे एका वेगळ्याच कारणामुळे. मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवणाऱ्या सलमानना यावेळी साथ मिळाली ती म्हणजे त्याची तथाकथित प्रेयसी लूलिया आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान याची.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#salmankhan night escapade  At around 230 am he was snapped with #arhaankhan and @vanturiulia leaving Galaxy apartments. Thry went for a short ride and were back home. #viralbhayani viralbhayani tausifshaikh10

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सोशल मीडियावर त्यांच्या या सायकलस्वारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मीडियारिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री २.३० च्या सुमारास सलमान, लूलिया आणि अरहान मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवत होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच जोर धरताना दिसत आहे. 

'भारत' या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा एकंदर प्रतिसाद पाहता सध्या कामाच्या व्यापातून सलमानने स्वत:साठी वेळ काढला आहे, असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, प्रदर्शनानंतर 'भारत' बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारताना दिसत आहे.

'भारत' चित्रपट प्रदर्शित होऊन सात दिवस उलटले आहेत. सात दिवसात चित्रपटाने तब्बल १६७ कोटी रूपयांचा गल्ला जमावला आहे. यंदाच्या वर्षी पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांपैकी सलमानचा 'भारत' चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या क्रमांकावर अभिनेता अमिर खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणारा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट आहे. 'ठग्स...'ने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी ५२ कोटी रूपयांचा गल्ला जमवत मजल मारली होती.