मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान आणि ईद हे बॉक्सऑफिसवरील समीकरण ठरलेले आहे.
प्रत्येकवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी नवा सिनेमा घेऊन येतो.
२०१९ सालच्या ईदसाठीही सलामान खानची तयारी सुरू झाली आहे. अतुल अग्निहोत्री निर्मित आणि अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' हा सिनेमा २०१९ सालच्या ईद दिवशी येणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच एप्रिल २०१८ नंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. ट्रेड अॅनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
यंदा ईदच्या दिवशी 'ट्युबलाईट' रसिकांच्या भेटीला आला होता. परंतू त्याला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर डिसेंबर २०१७ च्या ख्रिस्मसदरम्यान 'एका था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच 'टायगर जिंदा है' रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधून कॅटरिना आणि सलमान खान पुन्हा एकत्र येणार असल्याने रसिकांमध्येही फारच उत्सुकता आहे. यानंतर सलामान खान 'रेस ३' मध्ये झळकणार आहे.
यंदा 'सुलतान, 'टायगर जिंदा है' नंतर 'भारत' हा अली अब्बाससोबतचा सलामान खानचा सलग तिसरा चित्रपट आहे.