सलमानने भावुक व्हिडीओ शेअर करत दिली लतादीदींना श्रद्धांजली

 'फिर आपके नसीब में, ये बात...'  पाहा सलमानचा भावुक व्हिडीओ  

Updated: Feb 13, 2022, 11:47 AM IST
सलमानने भावुक व्हिडीओ शेअर करत दिली लतादीदींना श्रद्धांजली title=

मुंबई : लता दीदी आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या अठवणी, त्यांचं संगीतावर असेलेलं प्रेम कधीही विसरता येणार नाही. दीदींच्या जाण्याने प्रत्येकाच्या मनात एक मोठी पोकळी तयार झाली. दीदींचं निधन झालं असलं तरी त्यांच्या आठवणी कायम आपल्यात जिवंत राहतील. बॉलिवूडची अनेक गाणी दीदींच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली, जी आजही अनेकांना जगण्याची उमेद देतात... आता अभिनेता सलमान खानने देखील एक व्हिडीओ शेअर केला.

व्हिडीओ शेअर करत त्याने दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. व्हिडीओमध्ये सलमान 'फिर आपके नसीब में, ये बात...'  गाणं गात आहे. गाणं गात असतात सलमान अत्यंत भावुक झाल्याचं दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ शेअर करत सलमानने कॅप्शनमध्ये, 'तुमच्या सारखं दुसर कोणी नाही आणि असू देखील शकत नाही....' लिहिलं आहे. सलमानचा व्हिडीओ चाहत्यांना आवडत आहे.