किसिंग सीन करतना गडबडला सलमानचा मेहूणा, कारण अर्पिताने...

सलमानच्या मेहूण्याचा पहिला किसिंग सीन

Updated: Nov 14, 2021, 02:22 PM IST
किसिंग सीन करतना गडबडला सलमानचा मेहूणा, कारण अर्पिताने... title=

मुंबई : अभिनेता सलमान खानने अनेक नव्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये संधी दिली आहे.  त्यामुळे त्याला बॉलिवूडचा 'गॉडफादर' म्हणून ओळखलं जातं. सलमानने बहिण अर्पिताचा पती अभिनेता आयुष शर्माला देखील करियरच्या संधी उपलब्ध करून दिल्या. 'लवयात्री' चित्रपटाच्या माध्यमातून आयुषने कलाविश्वात पदार्पण केलं. पण आयुषचा पहिलाचं चित्रपट अयशस्वी ठरला. आता आयुष आणि सलमानचा 'अंतिम' चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात अनेक ऍक्शन सीन चित्रीत करण्यात आले आहेत. पण आयुषच्या रोमांटिक सीनमुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चर्चेत आला आहे.

चित्रपटात आयुषने अभिनेत्री महिमा मकवानासोबत काही किसिंग सीन दिले आहे. पण किसिंग देताना आयुषची मोठी गडबड झाली. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सध्या तुफान व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक रोमांटिक गाणं 'होने लगा' सध्या चर्चेत आहे. पहिल्यांदा किसिंग देत असल्यामुळे आयुषच्या मनात दडपण होतं. पण त्याने कथेची गरज असल्यामुळे किसिंग सीन शूट केला. 

किसिंग सीनमुळे आयुष घाबरला 
या चित्रपटातील 'होने लगा' या गाण्यात आयुष महिमा मकवानासोबत अनेक इंटिमेट सीन्स शूट करणार होता. यादरम्यान जेव्हा त्याला कळले की गाण्यात एक किसिंग सीन आहे, तेव्हा तो घाबरला. झूमला दिलेल्या मुलाखतीत आयुषने खुलासा केला की, या सीनच्या शूटिंगदरम्यान त्याच्या मनात हजारो गोष्टी सुरू होत्या. पत्नी अर्पिता आणि मुले हे पाहतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल? असं अनेक गोष्टी आयुषच्या मनात होत्या

 'अंतिम' चित्रपट 26 नोव्हेंबरला झी स्टुडिओजद्वारे जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सलमान, आयुष आणि महिमा मकवाना स्टारर 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित, सलमान खान निर्मित आणि सलमान खान फिल्म्स प्रस्तुत आहे....