close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्पिताच्या दुसऱ्यांदा आई होण्यावर सलमान म्हणतो...

अर्पिता आणि आयुष जवळपास ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

Updated: Oct 1, 2019, 11:54 AM IST
अर्पिताच्या दुसऱ्यांदा आई होण्यावर सलमान म्हणतो...

मुंबई : अभिनेता सलमान खानची लडकी बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. अर्पिताकडून मिळालेल्या गोड बातमीमुळे समस्त कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. अर्पिता आणि आयुष जवळपास ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अर्पिता आणि आयुष ४ वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर आर्पिता-आयुषने या बातमीला दुजोरा दिला. 

स्पॉटबॉयने घेतलेल्या एका मुलाखती दरम्यान अर्पिताला जेव्हा या गोड बातमीवर सलमानच्या प्रतिक्रिये बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, 'ही गोड बातमी ऐकून समस्त कुटुंब फार आनंदी आणि उत्सुक आहे.' अर्पिता जानेवारी महिन्यात तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. 

सलमान त्याच्या भाच्यासोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमानच्या चित्रपटांच्या सेटवर अनेकदा आहिलला पाहण्यात आलं आहे. अर्पिता आणि आयुष यांचा १८ नोव्हेंबर २०१४ मध्ये हैदराबादमध्ये विवाहसोहळा पार पडला. गेल्या वर्षी 'लवयात्री' चित्रपटातून आयुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.