नागा चैतन्यचं घर सोडून सामंथा अक्किनेनी शिफ्ट होणार मुंबईला? जाणून घ्या सत्य

साऊथ अभिनेत्री सामंथा अक्किनेनी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

Updated: Sep 29, 2021, 04:12 PM IST
 नागा चैतन्यचं घर सोडून सामंथा अक्किनेनी शिफ्ट होणार मुंबईला? जाणून घ्या सत्य title=

मुंबई : साऊथ अभिनेत्री सामंथा अक्किनेनी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती नागा चैतन्यसोबत तिचं लग्न अद्याप चांगलं चालत नसल्याच्या सध्या बातम्या आहेत. दोघंही विभक्त झाल्याच्याही बातम्या सातत्याने समोर येत आहेत. नुकतीच नागा चैतन्याने एक पार्टी आयोजित केली या पार्टीत कोठेही सामंथा दिसली नाही. अशा परिस्थितीत, सामंथा हैदराबादहून मुंबईला शिफ्ट होणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. मात्र आता सामंथा स्वतः बाहेर आली आहे आणि अशा अहवालांवरील सत्य तिने सांगितलं आहे.

समंथाने अलीकडेच तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आणि काही प्रश्नांची तिने उत्तरं दिली. या दरम्यान, तिने तिच्या शिफ्टिंगच्या बातम्यांवरही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका चाहत्याने सामंथाला विचारलं की, तुम्ही हैदराबादहून मुंबईला शिफ्ट होणार आहात का? यावर सामंथा म्हणाली, "मला माहित नाही की अशा गोष्टी कुठून पसरतात, पण आधीच्या गोष्टींप्रमाणे ही सुद्धा फक्त एक अफवाच आहे. ही पूर्णपणे चुकीची बातमी आहे. हैदराबाद हे माझं घर आहे आणि ते माझं नेहमीच घर असेल. हैदराबादने मला सगळंकाही दिलं आहे आणि मी ईथेच राहणार आहे आणि मला येथे खूप आनंद देखील मिळतो. त्यामुळे मी असल्या अफवांना फेटाळून लावते. 

याचबरोबर सातत्याने नागा चैतन्य आणि समंथा एकत्र राहत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नागा चैतन्य आजकाल आपल्या पालकांसोबत शिफ्ट झाला आहे. मात्र, विभक्त होण्याच्या बातमीवर दोन्ही स्टार्सनी अद्याप तरी काहीचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र त्यांनी या बातम्या नाकारल्या देखील नाहीत.

सामंथा आणि नागा चैतन्य यांना याबाबत अनेकवेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत पण यांवर दोघांनीही काहीच न बोलण्याला पसंती दिली आहे. दोघांच्या लग्नाचा वाढदिवस लवकरच आहे. चाहत्यांना आशा आहे की लवकरच दोघंही याबद्दल काही माहिती देतील.