मुंबई : साऊथ स्टार समंथा रुथ प्रभूने 'फॅमिली मॅन 2'मध्ये खलनायक राजीची भूमिका साकारून लोकांची मने जिंकली. त्यानंतर समंथा तिच्या खसगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर काही दिवसांतचं समंथाने नागा चैतन्यसोबत घटस्फोटाचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. घटस्फोटानंतर देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल वाऱ्यासारख्या चर्चा रंगल्या. आता पुन्हा समंथा चर्चेचा विषय बनली आहे.
समंथा तिच्या आगामी सिनेमात 'बायसेक्सुअल' महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. सामंथा रुथ प्रभू 'ऍरेंजमेंट ऑफ लव्ह' या फीचर सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा एका कादंबरीवर आधारित आहे. सिनेमात ती एका तमिळ बायसेक्सुअल महिलेची भूमिका साकारणार आहे.
एका वृत्तानुसार, सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक फिलिप जॉन यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी 'Downton Abbey' आणि 'The Good Karma Hospital' सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाची निर्मिती सुनीता ताती यांच्या गुरु फिल्म्स भारतीय संस्थेने केली आहे.
समंथा हिंदी, तेलुगू चित्रपटांमध्ये मोलाची भूमिका साकारली आहे. समंथाकडे एस.एस राजामौली यांचे 'ईगा', 'सुपर डिलक्स', 'जनाथा गॅरेज' आणि ''मेर्सला' सिनेमे आहेत.