Naga Chaitanya ला विसरण्यासाठी Samantha Ruth Prabhu करतेय ही गोष्ट

नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने आता स्वतःसाठी वेळ काढला आहे.

Updated: Oct 20, 2021, 09:29 PM IST
Naga Chaitanya ला विसरण्यासाठी  Samantha Ruth Prabhu करतेय ही गोष्ट

मुंबई :  दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने काही दिवसांपूर्वी चित्रपट स्टार नागा चैतन्यपासून घटस्फोटाची घोषणा केली. दक्षिण सिनेमाच्या या स्टार कपलने 2 ऑक्टोबर रोजी तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून एकमेकांपासून वेगळं होण्याची घोषणा केली. यानंतर, जवळजवळ 2 आठवडे सतत चर्चेत राहिल्यानंतर आता अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेली आहे. नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने आता स्वतःसाठी वेळ काढला आहे. सुट्ट्या घालवण्यासाठी ती अलीकडेच एका अतिशय सुंदर ठिकाणी रवाना झाली आहे.

अभिनेत्रीने स्वतः तिच्या सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. फॅमिली मॅन 2 स्टारर सामंथा रूथ प्रभूने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि सांगितलं की, ती सध्या ऋषिकेशमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. सामंथा रूथ प्रभूची हे फोटो असं दर्शवतात की, अभिनेत्री तिचा एक्स पती नागा चैतन्यला विसरण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच ती हैदराबादपासून दूर शांततेने परिपूर्ण असलेल्या ऋषिकेशमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. 

समंथा रूथ प्रभूंने नागा चैतन्यपासून घटस्फोट का घेतला?
हा प्रश्न अजूनही एक कोडं आहे. नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभू यांच्या घटस्फोटामागील कारणा अद्याप समोर आलेलं नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या दोन स्टार्सच्या घटस्फोटाचं मोठे कारण म्हणजे वेब सीरिज द फॅमिली मॅन 2 मध्ये अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने साकारलेले बोल्ड पात्र. ज्यामध्ये अभिनेत्रीने काही  इंटीमेट सीन्सही दिले. अहवालांनुसार, केवळ नागा चैतन्यच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनीही अभिनेत्रीच्या या सीन्सवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर या प्रकरणाबाबत दोन स्टार्समध्ये मतभेद होते.