अखेर समोर आलंच... घटस्फोटानंतर 'या' व्यक्तीसोबत समंथाला करायचाय Romance

समंथा ज्या व्यक्तीवर मनापासून भाळली आहे, त्याच्या नावाचा खुलासा तिनं केला.   

Updated: Feb 14, 2022, 05:35 PM IST
अखेर समोर आलंच... घटस्फोटानंतर 'या' व्यक्तीसोबत समंथाला करायचाय Romance   title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या घटस्फोटानंतर तिच्या नावाची आणि तिच्या खासगी आयुष्याची बरीच चर्चा झाली. अभिनेता नागार्जुन यांच्या कुटुंबाशी असणारं नातं आणि नागा चैतन्य याच्याशी असणारं तिचं वैवाहिक नातं बऱ्याच कारणांनी प्रकाशझोतात आलं. (Samantha Ruth Prabhu)

काही महिन्यांपूर्वीच नागा चैतन्य आणि समंथाचा घटस्फोट झाला. ज्यानंतर या दोघांनीही त्यांच्या आयुष्यात वेगळ्या वाटा निवडल्या. सरतेशेवटी आता कुठे ही जोडी त्यांच्या आयुष्यात स्थिरावू पाहत आहे. 

त्यातच समंथा ज्या अभिनेत्यावर  मनापासून भाळली आहे, त्याच्या नावाचा खुलासा तिनं केला. 

एका मुलाखतीत तिनं याचा खुलासा केला. समंथाच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. 

आपल्याला रणबीरसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करायचा असल्याची इच्छा तिनं मुलाखतीत व्यक्त केली. 

इथं लक्ष देण्याजोगी बाब अशी, की आतापर्यंत समंथाला बऱ्याच हिंदी चित्रपटांची ऑफर आली आहे. 

पण, भाषेवर प्रभुत्त्व नसल्या कारणाने तिला या ऑफर स्वीकारता आलेल्या नाहीत. आता मुद्दा असा, की येत्या काळात समंथाची रणबीरसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याची इच्छा पूर्ण होते, की तिला आणखी प्रतीक्षा करावी लागणार.... 

दरम्यान, रणबीरसह ऑनस्क्रीन रोमान्स करण्यासाठी अभिनेत्रींची रांग आधीच लागली आहे, त्यात आता समंथाला संधी केव्हा मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.