Saturday Panchang : आज दुर्गाष्टमी आणि गोपाष्टमीसह वृद्धि योग! 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाचा आशीर्वाद

9 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज शनिदेवासह हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे. आज दुर्गाष्टमी आणि गोपाष्टमी आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 9, 2024, 08:19 AM IST
Saturday Panchang : आज दुर्गाष्टमी आणि गोपाष्टमीसह वृद्धि योग! 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाचा आशीर्वाद title=
saturday panchang 9 november 2024 luckiest zodiac sign on saturday panchang in marathi

Panchang 9 november 2024 in marathi : आजचा दिवस अनेकांसाठी सुट्टीचा आहे. शनिवार हा निवांत आरामाचा दिवस असताना जर कुठलेले महत्त्वाचे कार्य किंवा शुभ कार्य करण्याचा तुम्ही विचार असाल तर आजचं पंचांग जाणून घ्या. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. तर आज वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र मकर राशीत असणार आहे. (saturday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शनिवार हा दिवस हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे. अशा या शनिवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या.  (saturday panchang 9 november 2024 luckiest zodiac sign on saturday panchang in marathi ) 

पंचांग खास मराठीत! (9 november 2024 panchang marathi)

वार - शनिवार 
तिथी - अष्टमी - 22:47:22 पर्यंत
नक्षत्र - श्रवण - 11:48:21 पर्यंत
करण - विष्टि - 11:27:09 पर्यंत, भाव - 22:47:22 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वृद्वि - 28:22:37 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:39:23
सूर्यास्त - 17:30:16
चंद्र रास - मकर - 23:28:22 पर्यंत
चंद्रोदय - 13:16:00
चंद्रास्त - 24:17:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:50:52
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 06:39:23 पासुन 07:22:47 पर्यंत, 07:22:47 पासुन 08:06:11 पर्यंत
कुलिक – 07:22:47 पासुन 08:06:11 पर्यंत
कंटक – 11:43:08 पासुन 12:26:32 पर्यंत
राहु काळ – 09:22:07 पासुन 10:43:28 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:09:55 पासुन 13:53:19 पर्यंत
यमघण्ट – 14:36:42 पासुन 15:20:06 पर्यंत
यमगण्ड – 13:26:12 पासुन 14:47:33 पर्यंत
गुलिक काळ – 06:39:23 पासुन 08:00:45 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:43:08 पासुन 12:26:32 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

'या' राशींसाठी आजचा दिवस असणार भाग्यशाली

मिथुन  

आजचा दिवस परिणामकारक असणार आहे. तुमचे जे काम पैशांमुळे रखडले होते ते शनिदेवाच्या कृपेने निराधार सिद्ध होतील आणि तुम्ही विचार करताय तितके गंभीर होणार नाही. चांगला नफा मिळणार आहे. नोकरी करणारे आपली कामे आनंदाने पूर्ण करतील. 

सिंह 

आजचा आनंदाचा दिवस असणार आहे. प्रत्येक पावलावर त्यांचा जोडीदार, मित्र आणि कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने दिसाल आणि तुम्ही काही मोठे निर्णय देखील घेऊ शकता. सिंह राशीच्या लोकांच्या घरात धार्मिक वातावरण असेल.

धनु

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. धनु राशीचे लोक मित्रांसोबत थोडा वेळ घालवतील आणि मित्रांसोबत काही कार्यक्रमात हजेरी लावतील. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल आणि अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळतील. 

कुंभ 

कुंभ ही शनिदेवाची मूळ त्रिकोणी राशी आहे आणि चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत जाणार आहे, त्यामुळे आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनी कोणत्याही कामासाठी सरकारी अधिकाऱ्याकडे अर्ज केला असेल तर ते सरकारी काम सहज पार पडेल. तुम्हाला चांगले आर्थिक लाभही मिळतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळेल, जी ते चांगले करतील आणि तुमच्या करिअरसाठीही ते फायदेशीर ठरेल.

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)