मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्यातील संबंध तुटणं लोकांना अजूनही पचत नाहीये. दक्षिण चित्रपट उद्योगाच्या या सगळ्यात लोकप्रिय आणि प्रेमळ जोडप्यामध्ये नेमकं काय घडलं की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाबद्दल सतत बातम्यांचा बाजार तापला आहे. सातत्याने बाहेर येत असलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये घटस्फोटाच्या कारणाबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. कधी अभिनेत्रीची जवळच्या मित्राशी वाढणारी जवळीकता, तर कधी तिची कुटुंब नियोजनातून माघार तर कधी तिच्या करिअरबद्दल बोललं जात आहे. आता या सगळ्या आरोपांना अभिनेत्रीने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
अभिनेत्रीने इन्स्टास्टोरीवर मोठी लांब पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'एखाद्याच्या दुःखात तुमच्या भावनांची गुंतवणूक पाहून मी भारावून गेले आहे. या कठीण काळात मला पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्या विरोधात चालणाऱ्या सगळ्या अफवांना जोरदार उत्तर देणाऱ्या सर्वांचे आभार. ती म्हणाली की, माझं अफेअर्स होतं, मला मुलं नको होती, मी संधीसाधू आहे आणि आता तर म्हणत आहेत की, माझा गर्भपात झाला आहे. घटस्फोट ही एक वेदनादायक प्रक्रिया आहे. मला ही वेदना एकट्याने सहन करू द्या. माझ्यावरील हा हल्ला असह्य होत आहे. पण मी वचन देते की, मी हे कोणालाही कधीच परवानगी देणार नाही आणि ना ते सांगत नाहीत ना मी स्वतःला तोडण्याची परवानगी देणार नाही.
सामंथाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला
याआधी, मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, अभिनेत्रीने तिचा मित्र प्रीतम जुकलकरसोबत वाढत्या मैत्रीमुळे घटस्फोट घेतला आहे. ज्यावर अभिनेत्रीने आज सकाळी एका पोस्टद्वारे प्रश्न विचारला होता आणि म्हटलं होतं की, 'महिलांशी संबंधित नैतिकता नेहमी प्रश्नाखाली असते. पुरुषांच्या नैतिकतेवर कोणीही प्रश्न करत नाही. त्यामुळे एक समाज म्हणून मुळात नैतिकता शिल्लक नाही.