सामंथा-विजय देवरकोंडाचा प्रायव्हेट व्हिडीओ कॉल पब्लिक; चाहत्यांना गॉगलमध्ये काय दिसलं?

अनेकदा हे दोन्ही कलाकार त्यांच्या पर्सन आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. कधी विजय देवरकोंडा रश्मिका मंदानासोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतो तर कधी सामंथा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी होणारी चर्चा जरा वेगळीच आहे. सोशल मीडियावर हे दोन्ही कलाकार खूप सक्रिय असतात. 

Updated: Aug 28, 2023, 01:07 PM IST
सामंथा-विजय देवरकोंडाचा प्रायव्हेट व्हिडीओ कॉल पब्लिक; चाहत्यांना गॉगलमध्ये काय दिसलं? title=

मुंबई : सध्या सिनेमांची रांग लागली आहे. एका पेक्षा एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीजसाठी सज्ज आहेत. तर अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. एकीकडे एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'गदर 2' आणि OMG2 हे सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.  तर दुसरीकडे विजय देवरकोंडा आणि सामंथाचा खुशी हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात  विजय देवरकोंडा आणि सामंथा मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा या जोडीमुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा सिनेमा १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनेकदा हे दोन्ही कलाकार त्यांच्या पर्सन आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. कधी विजय देवरकोंडा रश्मिका मंदानासोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतो तर कधी सामंथा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी होणारी चर्चा जरा वेगळीच आहे. सोशल मीडियावर हे दोन्ही कलाकार खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी काही ना काही तर शेअर करत असते. नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत हे दोन्ही कलाकार व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

खरंतर या दोघांचा एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. त्यामुळे समोर आलेला हा व्हिडीओ प्रमोशनल एक्टिव्हीटी असल्यांचं बोललं जात आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्संचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने म्हटलंय, या सगळ्या लोकांच्या अचानक लक्षात आलं की, हे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. व्हिडिओ कॉल नाही- तुम्ही देखील थिएटरमध्ये जाता आणि अचानक लक्षात येतं की ते पती-पत्नी नाहीत, तर ते फक्त अभिनेते आहेत आणि तिथे कॅमेरा आहे? म्हणजे ते आनंदी आहे. मग ते रेकॉर्डिंग असेल तर? ते कलाकार आहेत, त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. हे एक काम आहे. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, नाईट शेड संभाषण. तर अजून एकाने लिहीलंय, देवरकोंडा प्लीज आमच्या समांथाला सोड मला जेलस फिल व्हायला लागलं आहे. तर अजून एकजण म्हणालाय, सॅम व्हिडीओ कॉल नाहीये हा रेकॉर्ड करत आहेत. सामंथाच्या चष्मामध्ये पहा.  अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या व्हिडीओवर करत आहेत.

दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. येत्या १ सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सामंथा आणि विजय देवरकोंडाला एकत्र स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात काहीच शंका नाही.