कपूर कुटुंबात मलायका अरोराची एन्ट्री

शेअर केला हा फोटो 

कपूर कुटुंबात मलायका अरोराची एन्ट्री

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा आपल्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दोन दिवसांपू्र्वीच या दोघांना न्यू ईअर सेलिब्रेशन करताना एकत्र पाहण्यात आलं. मलायका आणि अर्जुनचे एकत्र फोटो समोर आले आहे. 

हे फोटो आहेत अर्जुन कपूरचे चाचू म्हणजे काका अभिनेता संजय कपूर यांनी दिलेल्या पार्टीतील. ही पार्टी त्यांच्या घरी देण्यात आली होती. 

यावेळी अर्जुन, मलायका एकमेकांचा हात पकडून संजय कपूर यांच्या घरी जाताना दिसत आहेत. यावेळी मलायकाने शिमरी आऊटफिट घातलं होतं. 

संजय कपूर यांनी त्यांच्या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत मलायका आणि अर्जुन एकत्र संजय कपूरसोबत दिसत आहेत. 

अर्जुनने या फोटोत मलायकाच्या खांद्यावर हात ठेवला असून या फोटोतून स्पष्ट होतंय की मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याला संजय कपूर यांनी परवानगी दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Family 

A post shared by Sanjay Kapoor (@sanjaykapoor2500) on

या पार्टीत करण जोहर देखील आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये अर्जुनने स्विकारलं होतं की, तो रिलेशनशिपमध्ये आहे. पण त्याने कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे मात्र सांगण टाळलं होतं.

संजय कपूरच्या अगोदर अनिल कपूरने देखील मलायका-अर्जुनच्या नात्यावर मोहर लावली होती. त्यांनी म्हटलं होतं की, अर्जुन खूष असेल तर आम्हाला काय त्रास आहे? 

मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन आणि मलायका यांनी मुंबईत एक घर देखील खरेदी केलं आहे. लवकरच हे दोघं आता लग्न करणार आहेत.