मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान खूप खोडकर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. कॅमेऱ्यासमोर ती गंभीर असेल पण खऱ्या आयुष्यात ती खूप मस्ती करते. याचा पुरावा तिने शेअर केलेल्या नुकत्याच तिच्या झालेल्या व्हिडिओमध्ये दिला आहे. सारा अली खानने नुकताच इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला खूप ट्रोल केलं जात आहे.
साराचा व्हिडिओ व्हायरल
सारा अली खान मोठ्या पडद्यावरील तिच्या अभिनयामुळे तसेच सोशल मीडियावर तिच्या मस्तीखोर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी सारा अली खानचा एक प्रँक व्हिडिओ चर्चेत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या स्पॉट गर्लसोबत असं काही केलं आहे की, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. साराने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. जो पाहताच व्हायरल झालाय.
बिकिनीमध्ये दिसली सारा
या व्हिडिओमध्ये सारा अली खान पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. सारा तिच्या स्पॉट गर्लसोबत स्विमिंग पूलच्या बाजूला उभी असल्याचं दिसतय. मात्र, खट्याळ साराच्या मनात बऱ्याच कुरबुरी सुरू होत्या. यानंतर साराने जे केलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आहे. जे पाहून कदाचित कोणालाच वाटलं नसेल की पुढे या व्हिडिओत सारा हे करणार आहे.
स्पॉट गर्लला पूलमध्ये दिला धक्का
सारा अली खानने तिला पूलमध्ये जोरात ढकललं आणि नंतर तिने स्वतः पाण्यात उडी मारली. सारा अली खानने याला प्रँक म्हटलं असलं तरी सोशल मीडिया यूजर्स याला प्रँक मानत नाहीत. युजर्स कमेंट देत आहेत आणि लिहित आहेत की, यात मजेदार काय आहे? त्याचबरोबर अजून एका युजरने लिहिलंय की, हे अजिबात चांगलं नव्हतं. एखादा असं पाण्यात कसं ढकलू शकतं?